आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येमेनमध्ये संयुक्त हवाई हल्ल्यात सनात १३ ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सना - येमेनच्या सरकारी फौजा आणि सौदीच्या लष्करी आघाडीने मिळून केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात सना येथे किमान १३ नागरिक ठार झाले, अशी माहिती येमेनच्या सुरक्षा दल आणी आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.

वृत्तसंस्थांनी म्हटले आहे की, या हवाई हल्ल्यात उत्तरेकडील ग्रामीण भागातील होदेईदा येथील दोन घरांचेही नुकसान झाले आहे. हा भाग येमेन बंडखोर शिते यांच्या नियंत्रणातील आहे. हल्ल्यात ठार झालेल्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे, अशी माहिती अल थावरा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. हा हवाई हल्ला शनिवारी झाला, यात घरांसह संपर्क यंत्रणेतील मनोरेही उद्ध्वस्त झाले.

याबाबत अधिकृत सूत्रांना विचारले असता त्यांनी सूड आणि शत्रुत्वाच्या भावनेतून हा हल्ला झाला असावा असे सांगितले मात्र, त्यापेक्षा अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा सौदी लष्कर पुरस्कृत संयुक्त हवाई हल्ला येमेनच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मार्च २०१५ मध्ये सत्तेवर आलेल्या सरकारच्या विनंतीवरून करण्यात आले जेव्हा बंडखोरांनी राजधानी सनात छुपे गनिमी हल्ले हल्ले सुरू केले. मग येमेन बंडखोरांना दक्षिणेकडे ढकलण्यास सुरुवात झाली.
येमेनमध्ये बंडखोर आणि सरकारी फौजा यांच्यात काही वर्षांपासून संघर्ष सुरूच आहे. या संघर्षात अनेक नागरिकांचा बळी गेला आहे.
बातम्या आणखी आहेत...