आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: एस्कलेटरमध्ये अडकला सफाई कर्मचारी, थोडक्यात वाचला जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाई (चीन)- हुबेई प्रांतात झालेल्या एस्कलेटर अपघाताला एक आठवडाही जात नाही तोच दुसरी एक घटना समोर आली आहे. शांघाईच्या क्लाऊड नाइन शॉपिंग मॉलमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याला पाय एस्कलेटरमध्ये अडकला. एस्कलेटरची स्वच्छता करीत असताना ही घटना घडली. ही घटना घडल्यावर एस्कलेटर थांबले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
एस्कलेटरचा चुकीचा वापर केल्याने ही घटना घडल्याचे शॉपिंग मॉलच्या मॅनेजरने म्हटले आहे. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव झांग आहे. त्याने सांगितले, की एस्कलेटर थांबवण्यासाठी बटण दाबण्यापूर्वी ते अगदी व्यवस्थित काम करीत होते. चीनमध्ये गेल्या आठवड्याभरात झालेला हा तिसरा अपघात आहे.
26 जुलैला एस्कलेटरमध्ये अडकून महिलेचा मृत्यू
हुबेई प्रांतातील जियांगशू शॉपिंग सेंटरमधील एस्कलेटरमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला होता. घटना घडण्यापूर्वी या एस्कलेटरची दुरुस्ती करण्यात आली होती. यावेळी इंजिनिर्सनी स्टिलचे पॅनल लावले होते. पण त्याचे स्क्रू लावले नव्हते. पॅनलवर पाय ठेवल्यानंतर महिला त्यात अडकली. यावेळी तिने प्रसंगावधान राखत मुलाला समोर फेकले. त्याला तेथील कर्मचाऱ्याने कॅच केले. या दरम्यान महिला पॅनलमध्ये फसली. यातच तिचा मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर बघा, सफाई कर्मचारी कसा अडकला एस्कलेटरमध्ये....