आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लिंटन यांना इसिसपेक्षा माझी जास्त चिंता - डोनाल्ड ट्रम्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडीतील वादग्रस्त विधाने करण्यात माहीर असलेल्या रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बेरोजगारी, परराष्ट्र धोरण, विकासावर भर देणे आदी वास्तविक मुद्द्यांवर भर न देता भावनिक मुद्द्याला हात घालत पुन्हा एकदा अमेरीकन जनतेची सहानुभुती मिळविण्यासाठी वा मुद्देच नसल्याने हिलरी क्लिंटन या अगोदर माझ्या समर्थक पाठीराख्यांविषयी बोलतात आणि नंतर इसिस बद्दल बोलतात, असे अनेत गैरलागू लोकांच्या जिव्हाळ्याचे नसलेले मुद्दे बोलून पुन्हा स्वत:चे हसे करुन घेत हा निवडणूक प्रचार फक्त क्लिंटन -ट्रम्प यांच्यातील चिखलफेकच राहील याची काळजी घेतलेली आहे, असे स्पष्ट दिसते आहे.
ते पुढे म्हणाले की, २० व्या शतकात अमेरीकेने फॅसिझम-नाझिझम-कम्युनिझमवर मात केली आता आम्हाला पुराणमतवादी इस्लामिक दहशतवादावा आपण हरविलेच पाहीजे, अशी भावना ट्रम्प यांनी निवडणुकीतील कळीची प्रचारयुध्दभूमी असणाऱ्या फ्लोरीडातील निवडणूक रॅलीत व्यक्त केली. ट्रम्प म्हणतात, स्वत:चे अपयश मिटविण्यासाठी हिलरी माझ्यासह माझ्या पाठीराख्यावर अधिक टीका करताहेत. अमेरीकेच्या सुरक्षेविषयी दहशतवादाविषयी बोलण्याऐवजी. ओबामा आणि क्लिंटन यांनीच देशात येण्यासाठी इसिसला दार उघडले आणि आज तेच अमेरीकेला महाग पडतेय. ही काही स्मार्ट पॉलीसी नव्हतीच यामुळे अमेरीका रसातळाला जाईल.

हिलरी-ट्रम्प-२६ रोजी आमने-सामने
राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार हिलरी क्लिंटन व ट्रम्प यांच्यात पुढील सोमवारी २६ सप्टेंबर रोजी चर्चा होणार आहे. ते पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी राष्ट्रीय चर्चेला सुरूवात झाली. त्यात सुरक्षा हा एक तीनपैकी महत्वाचा मुद्दा ठरला.अमेरीकेची दिशा अर्थात परराष्ट्र धोरणातील व अमेरिकेत येणारी वा मिळविण्याची समृध्दता हे इतर दोन हिलरी व ट्रम्प यांच्यातील निवडणूक प्रचारातील वादाचे आरोप-प्रत्यारोपाचे मुद्दे आहेत.

सिरियन निर्वासित विषारी कँडी
वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांचे थोरले सुपुत्र यांनी सिरियन निर्वासितांची निर्भत्सना करत त्यांना विषारी कॅन्डी(आइसफ्रूट) असे संबोधन ट्विटमध्ये वापरल्याने अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का बसला आहे. आणि ट्रम्प यांची प्रतिमाही डागाळली आहे.
बातम्या आणखी आहेत...