आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लिंटन यांनी घेतली राष्ट्रीय पातळीवर पुन्हा आघाडी, ताज्या पाहणीत पाठिंब्यात झाली वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना राष्ट्रीय पातळीवरील पाहणीत त्यांना दोन अंकी आघाडी मिळाली आहे. त्यांनी रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील पाहणीत त्यांना १० अंकांचा कौल मिळाला आहे. अर्थात, ३९ ते ४९ टक्के गुण त्यांना मिळाले आहेत. एक महिन्यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात मात्र चित्र खूप वेगळे होते. त्यात ३८ ते ४४ टक्के प्रतिसादकर्त्यांना क्लिंटन प्रामाणिक वाटत नव्हत्या; परंतु आता त्यात बदल झाला आहे. जवळपास ५७ टक्के महिलांनी क्लिंटन यांना आपला पाठिंबा दिला आहे. ८७ टक्के कृष्णवर्णीयांनी त्यांचे समर्थन केले आहे. गेल्या आठवड्यात फिलाडेल्फियात डेमोक्रॅटिक पार्टीचे अधिवेशन झाले होते. तेव्हापासून हिलरींच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. त्यांना अनेक समुदायाकडून पाठिंबा मिळू लागला आहे.

ट्रम्प ‘अपात्र’: हिलरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवारी डोनाल्ड ट्रम्प ‘अपात्र’ आहेत, अशी टीका हिलरी क्लिंटन यांनी केली आहे. ते अयोग्य आहेत, याविषयी माझ्या मनात कसलीही शंका नाही. आपले लष्कर, प्रशासन, नागरिक यांचा अपमान करण्यात ट्रम्प वेळ घालवतात. ट्रम्प यांना चित्रकार, नळ कारागीर, काचेचे कारागीर यांच्याविषयी कसलाही आदर वाटत नाही, असे हिलरी म्हणाल्या.
पुढे वाचा...
> ‘हिलरी इसिसच्या संस्थापक’ : ट्रम्प
>३ हजार बेरोजगार