आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीएनएन’ने माफी मागावी; १६ हिंदू संघटनांची मागणी, हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- सीएनएन या वृत्तवाहिनीने आपल्या कार्यक्रमात वाराणसीला मृत्यूचे शहर संबोधले असून हिंदू धर्माचा अपमान केला आहे, असा आरोप अमेरिकेतील १६ हिंदू संघटनांनी केला अाहे. त्यामुळे या वाहिनीने माफी मागावी तसेच सहा भागांचा ‘बिलिव्हर विथ रझा असलान’ हा कार्यक्रम बंद करावा, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात शनिवारी अमेरिकेच्या अनेक लहान-मोठ्या शहरांत निदर्शने झाली.
  
‘अमेरिकन हिंदूज अगेन्स्ट डिफेमेशन’ या बॅनरखाली या १६ संघटना एकत्रित आल्या आहेत. त्यांचे संयोजक अजय शहा यांनी सांगितले की, ‘असलान’ने हिंदू समुदायाला गंभीर नुकसान पोहोचवले आहे. अमेरिकेच्या शाळांत हिंदू मुलांची सुरक्षा धोक्यात टाकली आहे. सीएनएन उच्च मानके कायम ठेवण्यात अपयशी ठरली आहे. अपमानजनक सामग्रीबाबत माहिती दिल्यानंतरही हिंदू तज्ज्ञांशी चर्चा न करताच कार्यक्रमाचे प्रसारण सुरूच ठेवले.  असलानने फेसबुकवर एका वक्तव्यात म्हटले आहे की, माझा वृत्तपट हिंदू धर्माबाबत नव्हता, तर अघोरी या रहस्यमय हिंदू संप्रदायाबाबत होता.
बातम्या आणखी आहेत...