हॉंगकॉंग- एका प्रवाशाने दारु घेऊन विमानात गोंधळ घालायला सुरवात केली. त्याला इतरांनी आधी समज दिला. पण दारुच्या नशेत तो काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. अखेर इतर प्रवाशांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याचे हात-पाय सीटला बांधले. याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हॉंगकॉंगहून हे विमान रशियातील वालदिवोस्टोक येथे जात होते. प्रवास सुरळीत सुरु होता. यावेळी दारु घेतलेल्या एका प्रवाशाने गोंधळ घालायला सुरवात केली. प्रवाशांनी त्याला समजावले. पण तो काही एक ऐकत नव्हता. त्याचा त्रास वाढतच होता. त्याचे रुपांतर वादात झाले. एका प्रवाशाने त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. त्याला इतर प्रवाशांनीही साथ दिली. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाला सीटला बांधून ठेवण्यात आले. रशियाच्या विमानतळावर गेल्यावर त्या प्रवाशाला सोडण्यात आले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे फोटो....