ओस्लो - कोलंबियन राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सांतोस यांनी कोलंबियात पाच दशकांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या दृढनिश्चयी प्रयत्नांसाठी शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. विशेष म्हणजे जनमत चाचणीत मतदारांनी हा शांतता करार फेटाळून लावला आहे.
सांतोस यांनी एफएआरसीचे बंडखोर प्रमुख रोड्रिगो लंदनो ऊर्फ तिमोलियन तिमोचेंका जिमेनेज यांच्याशी २६ सप्टेंबरला शांतता करार केला होता. ४ वर्षांच्या बोलणीनंतर हा करार झाला होता. मात्र, २ ऑक्टोबर रोजी जनमत चाचणीत जनतेने हा करार फेटाळला. त्यामुळे सांतोस यांना शांततेचा नोबेल आश्चर्यकारक मानला जात आहे. हा पुरस्कार शांततेची अद्यापही आशा न सोडलेली कोलंबियन जनता व पीडित कुटुंबांना आदरांजली आहे, असे समितीने म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहे सांतोस? लॅटिन अमेरिकेला दुसर्यांना नोबेल...