आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोलंबियाच्या जनतेने फेटाळला शांतता करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोगोटा - कोलंबिया या लॅटिन अमेरिकी देशातील जनतेने सरकार आणि डाव्या विचारसरणीच्या फार्क बंडखोर यांच्यातील शांतता करार फेटाळला आहे. सुमारे ५२ वर्षांपासून सुरू असलेले फार्क बंडखोरांचे छुपे युद्ध रोखण्यासाठी सरकार आणि फार्क यांच्या चार वर्षांच्या चर्चेनंतर क्युबात हा करार झाला होता. रविवारी देशातील जनतेच्या मंजुरीसाठी सार्वमत घेण्यात आले होते. जनता या कराराच्या बाजूने मतदान करेल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांच्यासह जगभरातून व्यक्त करण्यात आली होती.

अध्यक्ष हुआन मॅन्युअल सांतोस यांनी म्हटले आहे की, शांतता चर्चा सुरू करण्यासाठी सोमवारी पुन्हा क्युबाला जाऊ, अशी घोषणा त्यांनी केली आहे. सांतोस यांना हा दुसरा धक्का आहे. एक म्हणजे जनतेने त्यांचे शांततेचे प्रयत्न धुडकावून लावले आहेत. दुसरा म्हणजे बहुतांश मतदारांना या सार्वमतासाछी मतदान करण्यास घराबाहेर काढण्यात त्यांना अपयश आले आहे. सुमारे १.३० कोटी मतदारांपैकी फक्त ३७ टक्के मतदारांनीच मतदान केले. निकालाचा फरक खूपच कमी होता. कराराच्या बाजूने ४९.८ टक्के मते पडली तर त्याच्या विरोधात ५०.२ टक्के. मतांमधील फरक फक्त ५७ हजारांचा होता.
बातम्या आणखी आहेत...