आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धशतकाचा हिंसाचार: कोलंबियात अडीच लाख बळी घेणारे गृहयुद्ध अखेर संपुष्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवानात जल्लोष करणारे नागरिक. - Divya Marathi
हवानात जल्लोष करणारे नागरिक.
हवाना- कोलंबिया सरकार व ‘फार्क’ बंडखोर यांच्यात ५२ वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध अखेर संपुष्टात आले. दोन्ही बाजूने ऐतिहासिक शांतता करार झाला आहे. अमेरिका खंडातील हा अखेरचा लष्करी संघर्ष ठरला आहे. क्युबाचे महान नेते फिडेल कॅस्ट्रो यांनी त्यात महत्वाची भूमिका वठवली आहे.

कोलंबियातील हिंसाचार थांबवण्यासाठी क्युबामध्ये गेल्या चार वर्षांपासून शांततेसाठी वाटाघाटी सुरू होत्या. त्यावर दोन्ही बाजूने यशस्वी सहमती झाली आहे. शांतता करारावरील तडजोड अंतिम टप्प्यात आहे. कोलंबिया सरकार व रिव्हॉल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया (फार्क )बंडखोर यांनी याबाबतची घोषणा गुरूवारी करण्यात आली. देशात आता शांतता आणि स्थैर्य येऊ शकेल, असा विश्वास संयुक्त घोषणापत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष जॉन मॅन्युएल सँटोस यांनी देशासाठी ऐतिहासिक बातमी व विशेष दिवस असल्याचे अगोदरच जाहीर केले. कोलंबियात शांतता या विषयावरील चित्रकला स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांसमोर त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. सुदैवाने आपण सुरक्षित बेटावर पोहचला आहोत, अशी प्रतिक्रिया फार्कचे नेते टिमॉलिआेन जिमेनिझ यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकार व फार्क यांच्यात चर्चेची अंतिम फेरी सुरू होती. मंगळवारी रात्री वाटाघाटींना यशस्वी दिशेने सुरू झाला. त्यानुसार शांतता कराराचा मसुदा तयार करण्यात आला. असून करारावर स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण झाली अाहे. लवकरच फार्क संघटना आपल्या लढवय्यांना वन क्षेत्रातून माघारी बोलावेल. त्यानंतर युद्धबंदी लागू होईल.
कोकेन उत्पादक देश
जगातील सर्वात मोठा कोकेन उत्पादक देश म्हणून कोलंबियाची आेळख आहे. देशात अर्धशतकाहून अधिक काळ डावे बंडखोर उजव्या विचारांच्या गटात संघर्षाला सुरूवात झाली होती. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी हिंसाचारात आणखी तेल आेतण्याचे काम केले. त्यामुळेच सरकारी पक्ष व फार्क यांच्यातील शांततेसंबंधीच्या गेल्या तीन वाटाघाटी निष्फळ ठरल्या होत्या.
१९६४ मध्ये झाली होती संघर्षाला सुरुवात
१९६४ मध्ये गृहयुद्धाला सुरुवात झाली होती. अमेरिकेतील हा सर्वात प्रदीर्घ चाललेला संघर्ष ठरला आहे. त्यात किमान २ लाख ६० हजार जणांचा बळी गेला आहे. त्यात सुमारे ६० लाखांहून अधिक नागरिकांना घरेदारे, गाव सोडून जाण्याची वेळ आली. ४५ हजार नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.
छोट्या बंडखाेर गटांचे आव्हान कायम
सरकारने मोठ्या बंडखोर गटाला शांततेसाठी राजी केलेले असले तरी नॅशनल लिबरेशन आर्मी (ईएलएन) हा गट मात्र अजूनही बंडाच्या भूमिकेत आहे. गटाचे सदस्य सातत्याने सामान्य नागरिकांचे अपहरण करू लागले आहे. त्यामुळे सरकारसमोर अशा लहान गटांचे मन वळवण्याचे आव्हान कायम आहे.
बातम्या आणखी आहेत...