आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोमात अलास्काची सैर, सर्व काही स्मरणात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - कोमा म्हणजे काही दिवस ते काही वर्षांपर्यंत गाढ निद्रेची स्थिती. जे या स्थितीहून परत येतात तेही आपला प्रत्येक अनुभव सांगू शकत नाहीत. प्रदीर्घ काळ्याकुट्ट भुयाराची स्थिती असाच बहुतेकांचा अनुभव असतो.
परंतु क्लेअर वाइनलँडचे प्रकरण वेगळे आहे. कॅलिफोर्नियातील १० वर्षीय क्लेअर दोन आठवड्यांहून जास्त काळ कोमाच्या स्थितीत राहिली. यादरम्यान घडलेला एक ना एक अनुभव तिच्या आठवणीत आहे. त्यापैकी सर्वात रोमांचक आहे तिची अलास्काची सैर. तेथे जाण्याचा तिने कधी विचारही केला नव्हता. कोमातून बाहेर आल्यानंतर ती तेथे जाऊनही आली. ‘द क्लॅरिटी प्रोजेक्ट’ नावाच्या व्हिडिओमध्ये तिचे अनुभव कथन आले आहे.

क्लेअरला सिस्टिक फिब्रोसिस हा अानुवंशिक आजार आहे. या आजारात फुप्फुस, मूत्राशय, यकृत व आतडे काम करणे बंद करतात. काही महिन्यांपूर्वी तिची प्रकृती बिघडली. ताप एवढा होता की शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिला कोमासारख्या स्थितीत नेऊन उपचाराचा निर्णय घेतला. ‘बेडजवळ लोकांच्या गप्पा मला ऐकू येत होत्या. मी उत्तरही देत होते. परंतु शब्द आवाजात रूपांतरित होत नव्हते. ते मनातच घोळत राहत. डॉक्टर मला पोटावर झोपवायचे तेव्हा मला स्वत:ला उलटे लटकवून घेतल्यासारखे वाटत होते. मी सरळ होण्याचा प्रयत्न करायचे, पण होऊ शकत नव्हते. एक दिवस मी स्वत: अलास्कात गेल्याचे जाणवले. तेथे बर्फाच्छादित दृश्य नितांत सुंदर होते. संपूर्ण दिवस मी तेथे फिरले. मी कित्येक तास एका मोठ्या इमारतीसमोर बसून राहिले. परंतु प्रत्यक्षात मी कधीच अलास्कासंबंधी चर्चाही केली नव्हती की तेथे जाण्याचा विचारही मनात आणला नव्हता. शरीरावर ठेवलेल्या आइसपॅकमुळे ते घडले होते. थंडी जाणवू लागताच माझे मन मला अलास्कात घेऊन गेले,’ असे क्लेअर सांगते.

क्लेअर ठणठणीत झाल्यानंतर आईवडील तिला अलास्काला घेऊन गेले. तिचे अनुभव ऐकून अलास्काच्या मंत्र्यांनी तिला अलास्का डेे परेडला बोलावले. तेथे तिने स्वप्नात पाहिलेली ठिकाणे ओळखूनही दाखवली.
बातम्या आणखी आहेत...