आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेप, टॉर्चर आणि नरसंहार, अशी घडवली 8 हजार मुस्लिमांची कत्तल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बोस्नियाचा कसाई म्हणूनही कुप्रसिद्ध असलेल्या माजी लष्करी कमांडर रातको म्लादिकला हेग येथील आंतरराष्ट्रीय कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याने 1992-1995 च्या बोस्निया युद्धात हजारो मुस्लिम एकत्रित आणून नरसंहार केला होता. तसेच म्लादिकसह त्याच्या हजारो सैनिकांनी त्याच शहरातील हजारो महिलांचा खुलेआम बलात्कार केला. कित्येक दिवस त्या महिलांवर अत्याचार करत राहण्यासाठी या नराधमाने रेप हाऊस देखील बनवले होते. 

 

शहरातच बनवला 'रेप हाऊस'
> जवळपास दोन दशकांपूर्वी झालेल्या बोस्निया युद्धा लष्कराचे नेतृत्व म्लादिककडे होते. यात त्याने प्रामुख्याने सेब्रेनिका येथील निष्पाप मुस्लिमांना अमानवीय यातना दिल्या. 
> म्लादिक आपले हजारो सैनिक घेऊन सेब्रेनिका शहरात धडकला. त्याने सर्वच पुरुषांना वेगळे करून बाहेर बोलावले. यानंतर आपल्या लष्कराला त्या सर्वांवर गोळ्या झाडून ठार मारण्याचे आदेश दिले. 
> यानंतर त्याने शहरातील सगळ्या मुस्लिम महिलांना उचलून एकाच छताखाली ठेवले. या ठिकाणाला त्याने 'रेप हाऊस' केले होते. यात सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवलेल्या महिलांवर कित्येक दिवस हजारो सैनिक बलात्कार करत होते. 
> या दरम्यानही त्याने आपल्या सैनिकांना आस-पासच्या गावातील मुस्लिम पुरुषांना शोधून आणण्याचे काम दिले. विविध गावांतून उचलून आणलेल्या पुरुषांना एका रांगेत उभे करून तोफेने संपवले जायचे.

 

2011 मध्ये झाली अटक

> मानवताविरोधी हिंसाचार आणि युद्ध गुन्हेगाराचे आरोप लागल्यानंतरही बोस्नियात त्याचा वीर म्हणून सत्कार करण्यात आला होता. दोन दशके इकडून तिकडे पळ काढत अटकेपासून वाचणाऱ्या म्लादिकला 2011 मध्ये हेग न्यायालयाने दोषी ठरवले. यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव पाहता त्याला अटक करण्यात आली. 
> बोस्निया सर्ब युद्धाच्या वेळी नरसंहारांचे आदेश देणारे तत्कालीन नेते रादोवान कराद्जिक आणि प्रेसिडेंट स्लोबोदान मिलोसेव्हिक या दोघांच्या विरोधातही खटला चालवण्यात आला. 
> इंटरनॅशनल कोर्टाने 2016 मध्ये कराद्जिकला 40 वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच मिलोसेव्हिकचा तुरुंगात असतानाच 2006 मध्ये मृत्यू झाला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या अमानवीय अत्याचारांचे आणि युद्धाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...