आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ-भारत सीमेवर धुमश्चक्री, ९ जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- नेपाळमध्ये नवीन राज्यघटनेवरून निर्माण झालेली राजकीय अस्थिरता वाढत चालली आहे. शनिवारी नेपालगंज जिल्ह्याजवळ मधेशी समुदाय आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालेल्या हिंसाचारात ९ जण जखमी झाले. नेपालगंज हा परिसर भारताच्या सरहद्दीजवळ येतो. अद्यापही ९०० ट्रक सरहद्दीजवळ अडकून पडले आहेत.

रूपैदिया सुरक्षा छावणीजवळ मधेशी समुदायाचे निदर्शक दाखल झाले, त्यावेळी हा संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संतप्त जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. शेकडो निदर्शकांनी दगडफेक केली. त्यात चार सुरक्षा रक्षकही जखमी झाले. या भागात जीवनावश्यक वस्तू असलेले शेकडो ट्रकच्या लांबच्या लांब रांगाच दिसू लागल्या आहेत. दरम्यान, मधेशी हे मूळचे भारतीय वंशाचे असून सरहद्दीच्या भागात राहतात. नवीन राज्यघटनेच्या मसुद्यात न्याय मिळालेला नाही, अशी मधेशी समुदायाचे म्हणणे आहे. त्यावरून देशात गेल्या एक महिन्यापासून मोठा हिंसाचार सुरू आहे. त्यात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला. देशात भेदभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप होत आहे.