आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Companies In China Hiring Womens For Give Massage To Their Employees

कर्मचाऱ्यांवर वाढला कामाचा ताण, कंपनीने मसाजसाठी हायर केल्या Girls

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय - चीनमध्ये एक गेमिंग कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक्सट्रा कामासाठी अनोखा बोनस देत आहे. कंपनीने त्यांच्या वर्कर्सच्या आरामाचा विचार करून त्यांच्यासाठी मसाजची व्यवस्था केली आहे. शांघायच्या गेम डेव्हलपर कंपनीने त्यांच्या ऑफिसमध्ये दोन मुलींना कामावर ठेवले आहे. त्या एक्स्ट्रा कामामुळे थकणाऱ्या कर्मचाऱ्यांना मसाजद्वारे आराम देतात. जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी क्वालिटी वर्क करावे यासाठी ही शक्ककल लढवण्यात आली आहे.

स्थानिक माध्यमांच्या मते, कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिव्हीजनमध्ये काम करणाऱ्या प्रोग्रामर्सना ऑफिसमध्ये दीर्घकाळ काम करावे लागते. त्यांच्यावर कामाचा ताणही अधिक असतो. अशा स्थितीत त्यांना मानसिक थकव्याबरोबर शारिरीक थकव्याचा सामनाही करावा लागतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी सेक्शनच्या मॅनेजरनी या मुली हायर केल्या आहेत. मैनेजरच्या मते त्यांनी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना आराम पोहोचावा यासाठी या मसाज गर्लस हायर केल्या आहेत.

काही कर्मचाऱ्यांनी या नव्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही कर्मचाऱ्यांना हा मूर्खपणाचा प्रकार वाटतो. चीनच्या लोकल मीडियानुसार सध्याच्या काळामध्ये कंपन्यांमध्ये चीअरलीडर्सप्रमाणे महिला किंवा तरुणींना कामावर ठेवण्याचे प्रकार वाढले आहे. कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक चांगले काम करावे यासाठी कंपन्यांना हा सर्वात चांगला मार्ग वाटतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, चीनच्या या कंपन्यांमधील PHOTOS...