आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे श्रीनिवास, डॉ. अमितने रचला इतिहास; जगातील सर्वांत कठीण सायकल रेस केली पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफाेर्निया- नाशिकचा अार्मी मॅन श्रीनिवास गाेकुलनाथ आणि नागपूरचे डॉ. अमित समर्थ यांनी जगातील सर्वांत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘रेस क्राॅस अमेरिका’ (रॅम) सायकलिंग स्पर्धेत  साेमवारी इतिहास रचला. गोकुलनाथ यांनी ही रेस पूर्ण करणारा पहिला भारतीय बनण्याचा मान मिळवला. त्यांच्या पाठोपाठ नागपूरच्या डॉ. अमितनेही ही रेस पूर्ण ककेली. गोकुलनाथ यांनी कॅलिफाेर्नियातील रेस ११ दिवस १८ तास अाणि ४५ मिनिटांत पूर्ण सातवे स्थान गाठले. नागपूरचे डाॅक्टर अमित समर्थही रेसमध्ये अाठव्या स्थानावर राहिले. नऊ पुरुषांच्या रेसमध्ये महाराष्ट्राच्या या दाेन सायकलपटूंनी धडक मारून नवा इतिहास रचला.   श्रीनिवास गोकुलनाथ हे नाशिक येथे आर्मीत कार्यरत असून, डॉ. अमित नागपूर येथील रहिवासी आहेत.

महाराष्ट्राचे तिघे सहभागी 
अमेरिकेतील या रेसच्या  साेलाे प्रकारच्या तीन दशकांच्या इतिहासात अातापर्यंत महाराष्ट्राच्या तीन सायकलपटूंनी सहभाग घेतला हाेता. यात नाशिकचे लेे. कर्नल श्रीनिवास गाेकुलनाथ, नागपूरचे डाॅक्टर अमित समर्थ अाणि समीम रिझवीचा समावेश अाहे.   

ख्रिस्टाेफ स्ट्रास्सेर चाैथ्यांदा चॅम्पियन
तीन वेळच्या चॅॅम्पियन व विश्वविक्रमवीर ख्रिस्टाेफ स्ट्रास्सेरने चाैथ्यांदा  रॅमची ट्राॅफी जिंकली. अाॅस्ट्रियाच्या या सायकलपटूने ८ दिवस ९ तास व ३४ मिनिटांमध्ये रेसचे निश्चित अंतर पूर्ण केले. याशिवाय ताे चाैथ्यांदा अव्वल ठरला. यापूर्वी त्याने २०११, २०१३ व २०१४ मध्ये या रेसची ट्राॅफी पटकावली.

सर्वात खडतर रेस 
जगातील सर्वात खडतर रेस म्हणून ‘रेस अक्राॅस अमेरिका’ अाेळखली जाते. १९८२ मध्ये या रेसच्या अायाेजनाला सुरुवात झाली. यामधील सहभागी स्पर्धकांना ४ हजार ९०० किमीचे अंतर पूर्ण करण्याचे टार्गेट असते. याशिवाय ही रेस चार गटांमध्ये अायाेजित केली जाते. यामध्ये महिला व पुरुषांच्या साेलाे, दाेन खेळाडू, चार खेळाडू अाणि अाठ खेळाडू सारख्या गटांचा समावेश अाहे. ही रेस महिला अाणि पुरुषांच्या गटात खेळली जाते. टूर द फ्रान्ससारखे यामध्ये स्टेज नसतात.   

१२ दिवसांत ४ हजार ९०० किमीचे टार्गेट 
रेसमधील सायकलपटूंना निश्चित अंतर पूर्ण करण्याचे टार्गेट दिले जाते. साेलाे प्रकारातील स्पर्धकांसाठी ४,९०० किमीचे अंतर १२ दिवसांत पूर्ण करावे लागते. यासाठी प्रत्येकी एका दिवसात  ४०० किमीचे अंतर गाठणे सक्तीचे असते. हिरवी झेंडी दाखवल्यानंतर अविरतपणे टायमिंग सुरू असते.   
बातम्या आणखी आहेत...