आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress CM Said Cow Killers Have No Right To Live In India

बीफवर काँग्रेसी सीएमचे वक्तव्य, गोहत्या करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : हरीश रावत. - Divya Marathi
फाइल फोटो : हरीश रावत.
हरिद्वार/नवी दिल्ली - बीफ आणि गोहत्येच्या मुद्द्यावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी पक्षाच्या मर्यादेबाहेर जात वक्तव्य केले आहे. गोहत्येचा निषेध करत त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, जे लोक असे करतात त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. मग ते कोणत्याही धर्माचे असोत. रावत असेही म्हणाले की, उत्तराखंडमध्ये गोहत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

वक्तव्य पक्षाच्या मर्यादेबाहेर का?
> बीफ किंवा गोहत्येच्या मुद्द्यावरून भाजप किंवा हिंदू संघटनांच्या नेत्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्व्यांवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.
> काही दिवसांपूर्वी भाजपचे सरकार असलेल्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी असे वक्तव्य केले होते, त्यावेळी काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.
> गोहत्येसंदर्भात अशा प्रकारचे वक्तव्य करणारे रावत हे पहिलेच मोठे काँग्रेस नेते आहेत.
> त्यांच्या आधी कर्नाटकमद्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांनी बीफ खाण्याचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यावरून मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता.

आणखी काय म्हणाले रावत?
> रावत म्हणाले की, आमचे सरकार देशातील असे पहिलेच सरकार आहे जे गोपालनासाठी जमीन आणि चाऱ्यासाठी मदत करते.
> गायीची सेवा करणे हे ईश्वरची सेवा करण्याप्रमाणे.
> कोणत्याही समुदायाने गोहत्या करणे मान्य केले जाऊ शकत नाही.

कुठे केले वक्तव्य?
हरीश रावत यांनी हरिद्वारमध्ये 'गोपाष्टमी'च्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. ते म्हणाले, गोहत्या करणाऱ्यांच्या विरोधात उत्तराखंड सरकारने सर्वात आधी प्रस्ताव मंजूर केला होता.