आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराक ओबामांना झटका, US काँग्रेसकडून व्हेटो रद्द; पीडित दाखल करू शकतील खटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेत झालेल्या 9/11 हल्ल्याच्या पीडितांच्या संदर्भातील विधेयकावर लावलेला व्हेटो अमेरिकी सिनेटमध्ये बहुमताने रद्द करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या नातेवाईकांनी सौदी अरेबियाविरोधात खटला दाखल करता यावा, या परवानगीसाठी अमेरिकी सिनेटने 'जस्टिस अगेन्स्ट स्पॉन्सर्स ऑफ टेररिझम अॅक्ट (जेएएसटीए) विधेयक सादर केले होते. मात्र, याविरोधात ओबामा यांनी नकाराधिकार (व्हेटो) लागू केला होता.

व्हेटोविरोधात झालेले मतदान बराक ओबामा आणि सौदी अरेबियासाठी मोठा झटका मानला जातो आहे. या विधेयक रद्द केल्यामुळे अमेरिकेसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया ओबामा यांनी दिली आहे.

दरम्यान, ओबामा यांच्या कार्यकाळात 11 व्हेटो लावण्यात आले होते. सगळ्यांना संसदेत बहुमताने मंजुरी मिळाली होती. ओबामा यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी लागू केलेला वीटो अमेरिकी काँग्रेस आणि सिनेटने रद्द केल्याची ही पहिलीच घटना आहे.
बातम्या आणखी आहेत...