आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांची मान अाखडली, इंजेक्शन घेऊन केली 9 तास सर्जरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुनान- डॉक्टरी हा एक व्यवसाय नसून जबाबदारी  का अाहे, याचे उदाहरण चीनमधील एका डॉक्टरने घालून दिले आहे. स्वत: भुलीचे (अॅनेस्थेशिया) इंजेक्शन घेऊन सर्जन डॉ. ली शीन यांनी सतत ९ तास एका मुलाची शस्त्रक्रिया करत त्याला वाचवले.


चीनच्या हुनान प्रातांत चेंझाऊ मुलांच्या रुग्णालयामध्ये एका मुलाच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्यामुळे याची जबाबदारी रुग्णालयातील प्रमुख सर्जन डॉ. ली शीन यांच्यावर सोपवण्यात आली. डॉ. ली शीन यांनी सतत ४ तास शस्त्रक्रिया केली. एकसारखी मान खाली राहिल्यामुळे ती अाखडली. मानेची हालचाल करता येईना आणि प्रचंड वेदना होत होत्या. तरीही डॉ. शीन ऑपरेशन थिएटरच्या बाहेरही गेले नाहीत आणि शस्त्रक्रियाही थांबवली नाही. त्यांनी सहकारी डॉक्टरांना मानेत भूल देण्यास सांगितले. त्यामुळे डॉ. शीन यांची मान सुन्न पडली. वेदनाही कमी झाल्या. त्यानंतर पुढील पाच तासांत शस्त्रक्रिया पूर्ण केली. जवळपास ९ तास सुरू असलेली शस्त्रक्रिया अखेर यशस्वी ठरली.

बातम्या आणखी आहेत...