आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततिनियमनाच्या गोळ्या आता पुरुषांसाठीही, जोसेफ टॅश औषधनिर्मितीत यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- बाजारात महिलांसाठी अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक औषधी उपलब्ध आहेत. मात्र, लवकरच पुरुषांसाठीही अशी औषधी येणार आहे. गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे अनेकदा महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
त्यामुळे संबंधित दांपत्यास कुटुंब नियोजन करताना अडचणी येतात. निरोधच्या वापरामुळे दांपत्यात सहजता येत नसल्याने पुरुषांसाठी ही गर्भनिरोधक गोळी तयार करण्यात अाल्याचे संशोधकांचे मत आहे. या संशोधनात कार्यरत बायोलाॅजिस्ट जोसेफ टॅश यांनी दिलेल्या माहितीनुसार, एच-२ गॅमेंडाझोल नामक ही औषधी पुरुषांत तयार होणाऱ्या शुक्राणूंची (स्पर्म) परिणामकारकता कमी करून टाकते.गॅमेंडाझोलमुळे स्पर्म विकसित होण्याची प्रक्रिया थांबते.

जिवंत स्पर्मची प्रक्रियाच थांबल्याने स्त्री-पुरुष बीजांडाचे फलनच होणार नाही. टॅश या प्रयोगावर २००१ पासून काम करत आहेत. शिवाय त्यांनी जेक्यू-१ नामक एक मिश्रणही तयार केले असून हे मिश्रण जननेंद्रियास स्पर्म विकसनाची प्रक्रियाच करू देत नाही.