आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी कार्यसंस्कृती पुन्हा तेजीत; सेवा देणाऱ्या व सामान पुरवणाऱ्या कंपन्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केटी स्टीनमेट्ज- अमेरिकेच्या लाँगबीच, कॅलीफाेर्नियाची ५१ वर्षीय गायिका शॅरी गत २८ वर्षांपासून जाेड्या जुळवण्याचे काम करत अाहेत. त्या या कामाला कंटाळल्या हाेत्या. त्यांनी नवीन प्रकारच्या कामाचा शाेध घेतला. त्यांची भेट एका महिलेशी झाली. सॅनफ्रान्सिस्काेतील कंपनी पाेस्टमेट्ससाठी स्वतंत्र कुरीअर कंपनीच्या रुपात १३ हजार रुपये प्रतिदिन कमवत हाेत्या. पाेस्टमेटस प्रमुख शहरांमधील रेस्टाॅरंट अाणि दुसऱ्या शहरांतील स्टाेअर्सच्या मागणीनुसार सामानाची डिलीव्हरी करते. सिंगर या कंपनीशी जाेडल्या गेल्या. एका सप्ताहात त्यांनी लाेकांना सामानाचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला. त्यांना स्मार्ट फाेनवर कंपनीकडून अाॅर्डर मिळते. त्यांना या कामाचा अनुभव नव्हता. मात्र, तरीही अाैपचारीक मुलाखतीची गरज भासली नाही.

अमेरिकेत पाेस्टमेट्ससारख्या कंपन्या घरबसल्या सामान अाणि सेवा हवी असणाऱ्या ग्राहकांशी जाेडल्या जातात. जे ग्राहक पैसे देऊन अशी कामे करुन घेऊ इच्छीतात, त्यांना ही सेवा मिळते. दिवसभरात अशाप्रकारे हजाराे देण्याघेण्याचे व्यवहार हाेतात. त्यासाठी ग्राहक अाणि कर्मचारी अशा पारंपरीक संबंधांची गरज पडत नाही. अापल्यालाच माध्यम समजणाऱ्या कंपन्या जुन्या माॅडेल्सपेक्षा वेगळ्या अाहेत. उदाहरणासाठी टॅक्सी सेवा कंपनी उबरकडे पहा. ही केवळ वर्षात ४००० अब्ज रुपयांची कंपनी बनली अाहे. उबरने अातापर्यंत एकाही चालकाला कामावर ठेवलेले नाही. त्यांनी ग्राहक अाणि टॅक्सीचालक यांच्यातील संपर्कासाठी साॅफ्टवेअर बनवले.

कारभाराच्या या पध्दतीला शेअरींग इकाॅनाॅमी अाॅन डिमांड इकाेनाॅमी, गिग इकाेनाॅमी म्हटले जाते. त्यांची मागणी खूप अाहे. टाइम मॅगजीन , पब्लीक रिलेशन फर्म बरसन - मारस्टाेलर अाणि एस्पेन इन्स्टीट्युटच्या सर्वेक्षणानुसार ४४ टक्के किंवा काेटी अमेरिकन नागरिक या प्रकारच्या उपक्रमात सहभागी झालेले अाहेत. सेंट जाेसेफ युनिव्हर्सिटीमध्ये विपणनाच्या प्राध्यापक मायकल साेलाेमन विचारतात की हे कामगारांसाठी चांगले किंवा वाईट अाहे का ? खरा प्रश्न हा अाहे की अापण काेणत्या प्रकारच्या कामगारांबाबत चर्चा करताेय. अशा अनेक कंपन्यांच्या विराेधात दाखल घटनांतून हा प्रश्न घुमताेय.टाइमच्या तीन हजार लाेकांच्या सर्वेक्षणात हे उलगडले अाहे की २२ टक्के किंवा साडेचार काेटी लाेक या प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊन चुकले अाहेत. दुसरीकडे उबर अाणि पाेस्टमेट्ससारख्या कंपन्या कर्मचाऱ्यांशी निगडीत खर्च अाणि कर वाचवून घेते. अशा प्रकारची कार्यशैली असणाऱ्या कंपन्यांच्या विराेधात सॅन फ्रान्सिस्काेपासून न्युयाॅर्कपर्यंत प्रदर्शने झाली अाहेत. सर्वेक्षणानुसार सामान अाणि सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अधिकांश लाेकांसाठी उत्पन्नाचा निश्चितच दुसरा काही स्त्राेत असताे. ते या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत अापल्या अर्थशास्त्राला सकारात्मक बनवतात. सुमारे एक तृतीयांश जण त्यांच्या उत्पन्नाच्या ४० टक्के भाग या प्रकारच्या सेवांमधून मिळवतात. तसे हे कामगार पारंपरीक नाेकरीत मिळणाऱ्या लाभ अाणि सुरक्षितता गमावून बसलेले असतात. अाता अापण सिंगरसारख्या कंपनीचा विचार करु. त्यांनी उमेदीने कामाला सुरुवात केली हाेती. मात्र, पार्किंग, स्मार्ट फाेनवरील खर्च अाणि कंपनीच्या काही नियमांमुळे त्याचा अपेक्षाभंग झाला. पाेस्टमेट्स विराेधात दाखल केलेल्या खटल्यात ताे प्रमुख फिर्यादी अाहे. त्याचा अाराेप अाहे की त्याला एखाद्या कर्मचाऱ्याप्रमाणे नियंत्रित केले जाते. त्यामुळे त्याच्याशी कर्मचाऱ्यासारखा व्यवहार केला जावा. सर्वेक्षणात ‘ई बे अाणि ईटसी यासारख्या प्लॅटफाॅर्म अाणि इतर सेवांमध्ये भागीदारी करणाऱ्या अमेरिकन लाेकांचे प्रमाण ७० टक्के अाढळले अाहे. अापले घर भाड्याने देणाऱ्या किंवा पैसे घेऊन किरकाेळ काम करणारे लाेक स्वतला कामगार मानत नाहीत. सर्वेक्षणात हेदेखील अाढळले अाहे की सेवा देणारे बहुतांश लाेक युवा, पुरुष शहरी अथवा कुठल्याशा अल्पसांख्यिक समुदायाशी निगडीत अाहेत. त्यात सुमारे ४० टक्के महिला अाहेत. काही घरमालक तर असे अाहेत, जे केवळ काही दिवसांसाठी त्यांचे घर भाड्याने देऊन अतिरिक्त पैसे कमावतात. कॅलीफाेर्नियाच्या उत्तरी भागातील काेर्टात सुरु असलेल्या खटल्यांमध्ये उबेरच्या वकीलांनी दावा केला अाहे की जर त्यांना सर्व चालकांना कंपनीत सामावून घेण्यास सांगितले तर कंपनीच्या ढाच्यालाच बदलावे लागणार अाहे.
सर्वेक्षणात ७१ टक्के लाेकांनी सेवेच्या त्यांच्या अनुभवाबाबत सकारात्मक मत व्यक्त केले. तर २२ टक्के लाेकांनी हा अनुभव संमिश्र स्वरुपाचा असल्याचे सांगितले. केवळ टक्के लाेकांनी हा अनुभव नकारात्मक असल्याचे म्हटले.

अनेक खटल्यांमध्ये हा अाराेप करण्यात अाला की जर सेवा देतानाच्या त्यांच्या पूर्ण खर्चाचा विचार केला तर ते किमान वेतनदेखील मिळवत नाही. नितीनिर्मात्यांना असे वाटते की जर पूर्वीचे करार बाद केले, तर अनेक मूलभूत सामाजिक करार तुटल्याने सरकार अाणि स्थानिक संस्थांवर प्रचंड बाेजा पडणार अाहे. नेते त्यात विद्यमान नियमावलीतून काही वेगळा मार्ग शाेधण्याचा प्रयास करीत अाहेत. सिएटल शहराच्या समितीने उबर अाणि लिफ्टच्या चालकांची युनियन बनवण्यास अनुमती दिली अाहे. अनेक राज्यांनी नवीन अर्थव्यवस्थेसह जाेडल्या गेलेल्या कंपन्यांची नाेंदणी बंधनकारक केली. काही कंपन्या जुन्या माॅडेलवर परतत अाहेत. कर्मचाऱ्यांना कंत्राटी कामगारांएेवजी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात अाहे.
विराेधाचा स्वर : टॅक्सीसेवा उपलब्ध करणाऱ्या उबर कंपनीच्य विराेधात न्युयाॅर्कमध्ये प्रदर्शन करणारे काही जुने चालक.

इन्स्टाकार्ड - हीकंपनी व्हाेल फूडसारख्या स्टाेअरमधून किराण्याचे सामान उपलब्ध करुन देते. पुरवठा करणारे काहीच कामगार कंपनीचे कर्मचारी अाहेत. अन्य सर्व कामगार कंत्राटी अाहेत.

एयर बीएनबी-कंपनीच्या माध्यमातून घरमालक अापलेच घर भाड्याने देतात. काही लाेक स्थानिक कायदा माेडतात. याअंतर्गत घर अल्पकाळासाठी भाड्याने देता येत नाही.

लिफ्ट-कंपनीचे चालक त्यांच्या स्वतच्या कारमधून लाेकांची ने - अाण करतात. कंपनी बांधिलकीसाठी ६५ हजार रुपयांचा बाेनस संबंधितांना देते.

टास्करिबेट- हीसाईट घरगुती किंवा तत्सम कामांसाठी कामगार पुरवते. कामगार मेहनताना स्वतच निश्चित करतात.

उबर-अॅपच्यामाध्यमातून टॅक्सी सेवा देणारी फर्म दर महिन्यात जगभरातील हजाराे चालक अापल्यासमवेत जाेडते.

जिर्क्स-यांचेउपभाेगकर्ते पार्किंग सुविधेचा उपयाेग करु शकतात. कारचे पार्किंग कुणी दुसरा चालक करताे, त्याला वॅलेट म्हटले जाते.

केवियर-कुरीअरकंपनीच्या जाहिरातीत प्रख्यात रेस्टाॅरंटमधून अन्नाची डीलीव्हरी करणाऱ्यांना १६०० रुपयेे प्रति तास देण्याचा दाव केला जाताे.

हंॅडी- हीस्टार्टअप कंपनी घराची सफाई अाणि अन्य काम करणाऱ्या कामगारांना उपलब्ध करुन देते. हंॅडीचे म्हणणे अाहे की माेठे कंत्राटदार प्रति सप्ताह ६५ हजार रुपयेदेखील कमावतात.

पोस्टमेट्स-हीकंपनी लाॅस एंजलीसपासून अटलांटापर्यंत एका तासात सामान पाेहाेचविण्याची गॅरंटी देते. कंपनीचा दावा असा अाहे की त्यांचे कुरीअर हाेण्याचे काम करणे हे अमेरिकेतील सगळ्यात चांगले अर्धवेळ काम अाहे.