आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Hot Yog Guru Bikram Chaudhari Say, Women\'s Like Me. News In Marathi

महिलाच माझ्यावर प्रेम करतात, हॉट योगागुरु विक्रम चौधरींनी आरोप फेटाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: अमेरिकेत योग विकवताना बिक्रम)
न्यूयॉर्क- वादग्रस्त हॉट योगगुरु बिक्रम चौधरी यांनी त्यांच्यावर करण्‍यात आलेले बलात्काराचे सर्व आरोप फेटाळले आहेत. महिला माझ्यावर प्रेम करतात. मी कोणत्याही महिलेवर जोरजबरदस्ती केलेले नसल्याचे स्पष्टीकरण बिक्रम चौधरी यांनी दिले आहे.

काय आहेत आरोप
शिष्या जिल लाव्लर हिने योगगुरु ब्रिक्रम चौधरी यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तीन वर्षांपूर्वी योगा क्लासदरम्यान योगगुरुंनी आपल्यावर बलात्कार केला. नंतरही अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. बिक्रम चौधरी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत.

योगगुरुंनी 'सीएनएन'ला दिलेल्या इंटरव्ह्युमध्ये सांगितले की, 'एक सत्य जगासमोर सांगत आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नाही. महिलाच माझ्यावर प्रेम करतात. महिलांना त्यांच्या वकिलांनी माझ्याविरुद्ध तक्रार देण्यास प्रवृत्त केले आहे. महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, याचे मला मला दु:ख आहे.

चौधरी म्हणाले की, याप्रकरणामुळे खूप बदनामी झाली आहे. एवढेच नव्हे तर संसारही उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. पत्नी माझ्याशी बोलत नाही. मी घरात एकटाच बसलेला असतो. त्यामुळे मला जीवन जगणे कठीण झाले आहे.

कोन आहेत बिक्रम चौधरी
69 वर्षीय बिक्रम चौधरी हे 'बिक्रम योगा' या संस्थेचे संस्थापक आहेत. हॉट योगगुरु म्हणून बिक्रम चौधरी प्रख्यात आहेत. मॅडोना, डेमी मूर, बिल क्लिंटन कन्या चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लूनी यांच्यासारखे योगगुरुचे फॉलोअर्स आहेत. याशिवाय हॉलीवूड, क्रीडा आणि राजकारणातील हायप्रोफाईल सेलिब्रिटीज योगगुरुकडे योगाचे धडे घेतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, वादग्रस्त योगगुरु बिक्रम चौधरी असा शिकवतात HOT YOGA