आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त सेल्फीमुळे गरीब मुलगी झाली लखपती, ट्विटरनेदेखील केले ट्विट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेद्दाह - एका वादग्रस्त ट्विटने कचरा वेचणाऱ्या मुलीला लखपती बनवले आहे; परंतु सध्या मुलीचा लोक शोध घेत आहेत. लोकांना तिच्याशी संपर्क साधता आलेला नाही. सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये एका तरुणाने कचरा गोळा करणाऱ्या या आफ्रिकन मुलीला पाहिले होते.

मुलीच्या अंगावर सौदी अरेबियाच्या प्रसिद्ध फुटबॉल संघ अल इत्तिहादची जर्सी दिसून येते. त्याला पाहून तरुणाला खोड काढावी वाटली. त्याने मुलीसोबत सेल्फी काढली. स्नॅप चॅटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला. कॅप्शन होते- ‘बघ, अल इत्तिहाद कोठे कचऱ्यात पडला आहेस’ हे पाहून लोकांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली. ट्विटरनेदेखील सेल्फी घेणाऱ्यावर टीका केली. हा तरुण त्या मुलीची टिंगल करतोय. टीकेची झोड उठल्यानंतर स्नॅप चॅटवरून हा फोटो काढण्यात आला.
परंतु तोपर्यंत सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो वर्णभेद करणारा असल्याची टीका झाली. सोशल मीडियावरून उतरून हा वाद सौदीमधील सामान्य नागरिक आणि प्रवाशांपर्यंत पोहोचला आहे. संतापाची लाट उसळल्यानंतर लोकांच्या मनात त्या मुलीविषयी सहानुभूती वाटू लागली. पोस्ट करणाऱ्या तरुणाने माफी मागितली आणि मुलीला भेटून तिला भेटवस्तू दिली. त्याचेही फोटो ट्विटरवर टाकले. त्यानंतर लोकांनी सदर मुलीस आर्थिक मदत करण्याची मागणी केली.

एका आठवड्यात मुलीसाठी ७५ लाख रुपये जमा झाले; परंतु मुलीला त्याची काहीच कल्पना नाही. त्या मुलीचा शोध कसा घ्यायचा हीच आता लोकांसमोरील समस्या आहे.

वाद वाढल्यानंतर मागितली माफी
पहिल्यांदा कचराकुंडीसमोर सेल्फी घेतला. वाद वाढल्यानंतर मुलीला भेटवस्तू देऊन माफी मागितल्याचा फोटो पोस्ट केला होता.

मोठे दानशूर
इत्तिहाद क्लबचे एक श्रीमंत दानशूराने मुलीला १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. सौदीचे फॉर्म्युला ड्रायव्हर यजिद अलराझीने १०.५ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. एवढीच रक्कम एका अन्य दानशूराने दिली आहे. अल इत्तिहादच्या फॅन्स क्लबने ८५ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्याशिवाय सामन्याची सर्व तिकिटे मोफत आणि दर महिन्याला मुलीस भत्ताही दिला जाणार आहे.