आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉशिग्टन विद्यापीठात बुलेटिन बोर्डवर स्वस्तिक चिन्ह लावल्याने तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - हिंदू धर्माच्या स्वस्तिक या पवित्र चिन्हावरून जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात भलताच वाद उद्भवला. एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या बुलेटिन बोर्डवर स्वस्तिक चिन्ह लावले. यावरून त्या विद्यार्थ्याला विद्यापीठातून काढून टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

विद्यापीठाच्या या निर्णयाचा द हिंदू अमेरिकन फाउंडेशनने विरोध केला. शिवाय इतर संघटनांनीदेखील विद्यापीठाचा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. या विरोधाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्याच्या निलंबनाची प्रक्रिया रोखली.

विद्यापीठ कर्मचाऱ्यांना या चिन्हाचे हिंदू धर्मातील स्थान माहीत नसल्याने हा टोकाचा निर्णय घेण्यात आला. वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांना हे नाझींचेच चिन्ह वाटले. जर्मन नाझींचा तिरस्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला स्वस्तिक चिन्हाची माहिती दिली. भारतीय संस्कृतीविषयी आपल्या इतर मित्रांना कळावे म्हणून हे चिन्ह विद्यार्थ्याने बुलेटिन बोर्डवर लावले होते. हिंदू, जैन, ज्यू समुदायांनी विद्यापीठाला निलंबनाचा निर्णय रद्द करण्याविषयी आग्रह केला. स्वस्तिकाचा नाझीपूर्व इतिहास विद्यापीठ प्रशासनाला कळवण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...