इंटरनॅशनल डेस्क - दक्षिण ऑस्ट्रेलियात एक छोटेसे गाव आहे कूबर पेडी. येथे 60 टक्के लोक अंडरग्राऊंड घरांमध्ये राहतात. या गावात ओपलच्या ब-याच खाणी आहेत. एकट्या कूबर पेडीत 70 पेक्षा जास्त ओपल फील्ड्स आहेत. ओपलच्या माइनिंगसाठी हे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. हे ठिकाण कामगारांना आवडल्याने त्यांनी यात अतिरिक्त खोल्या बांधून राहायला सुरुवात केली. बार, कॅसिनो, चर्च सर्व येथे आहे...
- जमिनीच्या खाली असलेल्या या घरे सर्व सुख-सुविधांनी सज्ज आहेत. असे येथे जवळपास 1500 घरे आहेत. यात 3500 पेक्षा जास्त लोक राहतात.
- या घरांना डग आऊट्स म्हटले जाते. येथे उन्हाळ्यात एसीची व थंडीत हिटरची गरज नसते.
- जमिनीच्या आत असल्याने येथे तापमान नेहमी आरामदायी राहते. लोक मोठ्या आनंदाने कोणत्याही अडचणीशिवाय येथे राहतात.
- अंडरग्राऊड घरांमध्ये स्टोर, बार कॅसीनो, संग्रहालय आणि चर्चसह खूप काही आहे.
- येथे अनेक हॉलीवूड चित्रपटांचे चित्रिकरणही होत असते.
- हे ठिकाण आता हॉट टुरिझ्म डेस्टिनेशन बनले आहे.
पुढील स्लाइड्सवर फोटोज...