आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनशैली: महिलांच्या बरोबरीने पुरुषांचाही कॉस्मेटिक उपचाराकडे कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोेएल स्टीन- जगभरात शारीरिक सौंदर्यवर्धनासाठी अनेक प्रकारचे कॉस्मेटिक उपचार करण्यात येत आहेत. अमेरिकेसह अनेक देशांत खासकरून महिलांमध्ये कॉस्मेटिक उपचार वाढत आहेत.कुणी चेहऱ्यावर इंजेक्शन घेते, कुणी शरीरातील अनावश्यक चर्बी हटवण्याचे उपचार घेते, तर कुणी जाडीवाढवण्याचे उपचार घेत आहेत. आता शल्यचिकीत्सेशिवाय उपचार होत आहेत. सामान्य डॉक्टर, नेत्र तज्ज्ञ, दंतचिकित्सकांचे क्लीनिक हाय टेक ब्यूटी सलूनमध्ये बदलले आहेत. सोशल मीडिया, फोन कॅमऱ्यामुळे लोक कायम तंदुरूस्त राहु इच्छिता.

सुंदर दिसण्याची इच्छा फक्त अमेरिकेपर्यंतच मर्यादित नाही. सिओल, बेरुत आणि रिअो डि जेनेरिअोमध्ये महिला आपल्या कॉस्मेटिक उपचारांसंबंधी गर्वाने सांगतात. दक्षिण कोरियामध्ये दर पाच महिलांपैकी एका महिलेने कॉस्मेटिक सर्जरी केलेली आढळेल. ब्राझीलमध्ये पाच वर्षापूर्वी प्रथम प्लास्टिक सर्जरीला टॅक्समधून वगळण्यात आले होते. अधिकाऱ्यांचा तर्क आहे की, कॉस्मेटिक उपचार शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य योग्य राखते. केस आणि शरीर झाकणाऱ्या इराणी महिला नाकाची सर्जरी (रीनोप्लास्टी) करून घेण्यात जगात सर्वात पुढे आहे.
अमेरिकेमध्ये २०१४ मध्ये दीड कोटीपेक्षा अधिक डॉक्टरांनी कॉस्मेटिक उपचार केले. ही संख्या २००० सालच्या तुलनेत दुप्पट आहे.अमेरिकनांनी कॉस्मेटिक उपचारावर ८२६ अब्ज रुपये खर्च केले. जाडी कमी करणे आणि स्तनांवर सर्वाधिक शस्त्रक्रियेसाठी सर्वाधिक पैसा खर्च केली. शस्त्रक्रियारहित उपचार स्वस्त आहेत. त्यांचे चलन वाढले आहे. अमेरिकन डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या तुलनेत पाचपट अधिक शस्त्रक्रियारहित उपचार केले. ३६ लाख राऊंड बोटॉक्स आणि इतर ब्रांडचे इंजेक्शन वापरले जातात. जुवेडर्म, रेस्टिलेनचे १७ लाख इंजेक्शन देण्यात आले. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरऐवजी ब्यूटीशियन बनले आहेत. यापैकी ८३ टक्के डॉक्टर बोटॉक्सव्दारे उपचार करतात.

अमेरिकेमध्ये कॉस्मेटिक उपचारांची स्विकार्यता वाढली आहे. डर्मेटोलॉजिक शस्त्रक्रीयेच्या अमेरिकन सोसायटीच्या सर्वेक्षणात हे समोर आले आहे की, गेल्या वर्षी ५२ टक्के लोक सौंदर्यवर्धनाचे उपचार करण्याच्या बाजूने असल्याचे आढळले. वेबसाइट रियलसेल्फ डॉट कॉम प्लास्टिक सर्जन, डर्मेटोलॉजिस्टचे मानांकन करतात. याला पाच कोटी दहा लाख जण भेट देतात. साइटचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम सीरी विचार करायचे, कॉस्मेटिक उपचारांवर महिलांचे मत मागणे अवघड असेल. मात्र, ते त्यांची शंका चुकीची असल्याचे सिध्द झाले. महिलाच नाही तर काही पुरूषही कायम फक्त चेहराच नाही तर शरीराची छायाचित्रेही पोस्ट करतात.

पेनसिल्वेनिया विद्यापीठातील मेडिकल स्कूलचे मानसोपचारतज्ज्ञ डेविड सरवेर म्हणाले, काही दिवसांपूर्वी अनेक चिकित्सक रूग्णांना सांगायचे की कॉस्मेटिक प्रक्रिया क्षीण आत्मसम्मानाचे लक्षण आहे. परिस्थिति बदलली आहे. अदिक आकर्षक व्यक्तीला आयुष्यभर प्राथमिकता मिळते हे प्रमाणीत आहे. सौंदर्यनिखारासाठी नवीन औषधे आणि विधींमुळे कॉस्मेटिक उपचारांमध्ये क्रांती आणली आहे. २००२ मध्ये बोटॉक्सची कॉस्मेटिक उत्पादनांच्या रुपात आल्यानंतर जास्त करून संशोधन त्वचाविज्ञानात (डर्मेटोलॉजी ) झाले आहे.हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डर्मेटोलॉजीचे प्रोफेसर रॉक्स अंडरसन यांनी यापैकी अनेक गोष्टींवर संशोधन केले आहे.

प्लास्टिक सर्जरीचा ग्लोबल ट्रेंड
२०१३मध्यें प्लास्टिक सर्जरीची टक्केवारीच्या हिशेबात दहा देशांची वर्गवारी
ब्राझील 12.9%
अमेरिका 12.5
मेक्सिको 4.2
जर्मनी 03
कोलंबिया 2.5
व्हेनेझुएला 02
स्पेन 1.8
इटली 1.6
अर्जेंटीना 01
इराण 01

महिलांचे विश्व
2014 मध्ये अमेरिकीत एक कोटी ३६ लाख महिलांनी कॉस्मेटिक उपचार केले. यात १६ लाख शस्त्रक्रियांचा समावेश आहे. यात स्तनांशी संबंधीत शस्त्रक्रिया जास्त आहेत.पुरुषांमध्ये नाकाची शस्त्रक्रिया लोकप्रिय आहे.

सौंदर्याचे मूल्य
अमेरिकनांनी २०१४मध्ये कॉस्मेटिक उपचारावर ८२६ अब्ज रुपये खर्च केले. उपचारांच्या काही

प्रक्रियांचा खर्च अशा प्रकारे...
रीनोप्लास्टी - 3 लाख रुपये - शस्त्रक्रियेनंतर नाकाची सूज काही आठवड्यांत संपते. तसे, नाकाचा आकार बदलण्याचे काम एक वर्षापर्यंत सुरू असते. यानंतर योग्य आकार येतो.
लिपोसक्शन - 2 लाख रु. - 2 लाख रुपये - शरीरातील अतिरिक्त चरबी हटवण्यासाठीच्या शस्त्रक्रीयेचा खर्च सर्जनचा अनुभव आणि वापरल्या गेलेल्या पद्धतीवर अवलंबून असतो. शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांपर्यंत सूज कायम राहू शकते.
बोटॉक्स - 24000 रुपये - बोटॉक्सव्दारे सुरकुत्या कमी होतात. हे औषध मांसपेशितील मज्जातंतूना थबकवते. ते आकुंचन पावू शकत नाही.
चेहरे फेस लिफ्ट - 41 लाख रुपये - चेहऱ्याला सुंदर करण्याची शस्त्रक्रीया. कानाच्या मागील भागापासून कानांच्या खालपर्यंत होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...