आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोस्टारिकाला ‘आेटो’चा तडाखा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनहोज : कोस्टारिकामध्ये शुक्रवारी आेटो चक्रीवादळामुळे ९ जणांचा मृत्यू झाला. वादळामुळे मध्य अमेरिकेत दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यानंतर चक्रीवादळ प्रशांत महासागराच्या दिशेने वळले.
कोस्टारिकाचे राष्ट्राध्यक्ष लुईस गिलर्मो सोलिस यांनी कोस्टारिका-निकारागुआच्या दक्षिणेकडील बगासेस व उपाला शहरात नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. सुरुवातीला बिजागुआमध्ये ६ जण बेपत्ता झाले होते. सहा तासांत महिनाभरात पडेल, इतका पाऊस झाला आहे. पुराचे पाणी वाढू लागले आहे. अनेक भागांना पुराचा वेढा पडल्याने अनेक लोक अडकले आहेत. अमेरिकेने मदतीसाठी विमाने रवाना केली आहेत. शेजारच्या पनामाने विमाने तसेच हेलिकॉप्टरची मदत दिली आहे. वादळामुळे ४०० घरांचे नुकसान झाले आहे. वादळाचे केंद्र अल सॅल्वाडोरची राजधानी सान सॅल्वाडोरच्या दक्षिणेस सुमारे ३९५ किलो मीटरवर आहे. चक्रीवादळाचा वेग ताशी ९५ किलोमीटर एवढा होता, असे अमेरिकेच्या नॅशनल हरिकेन सेंटरने सांगितले. प्रशांत महासागराच्या दिशेने हे वादळ असल्याने इतर देशही आता हादरले आहेत. त्यामुळे बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...