आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये एेतिहासिक मतदान, १० लाख भारतीयांचाही कौल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगाचे लक्ष लागलेल्या ब्रिटनमध्ये गुरुवारी सार्वमताची प्रक्रिया यशस्वी पार पडली. २८ देशांच्या युरोपियन संघटनेत राहायचे किंवा नाही, याबाबतचा कौल जनतेने दिला आहे. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे.

देशभरातील सर्व मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. युरोपियन संघटनेत राहावे म्हणणारा आणि बाहेर पडावे, असे दोन्ही वर्ग ब्रिटनमध्ये आहेत. दोन्ही बाजूंनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार झाला होता. त्यामुळे गुरुवारी झालेल्या मतदानातील टक्का वाढला. ४ कोटींहून अधिक नागरिकांनी आपला कौल नोंदवला. त्यात १० लाख २० हजारांवर भारतवंशीय नागरिकांनी आपला हक्क बजावला. त्याअगोदर ३ लाख ४५ हजार नागरिकांनी पोस्टाद्वारे मतदान केले आहे. मतदानाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी ब्रिटन संघटनेतून निश्चितपणे बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कॅमरून यांनी पत्नी समांथा यांच्यासह वेस्टमिन्स्टरच्या मतदान केंद्रावर मतदान केले. डाउनिंग स्ट्रीटपासून हे केंद्र जवळच आहे. संघटनेतून आपण बाहेर पडल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था आणखीनच कमकुवत होईल, हे मान्य असले तरी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे कॅमरून म्हणाले.

विरोधी गटाचे नेते व लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन म्हणाले, ही अंतिम लढाई आहे. खरे तर स्वातंत्र्य दिन म्हटला पाहिजे. आमच्या मोहिमेला यश मिळणार आहे, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, याच वर्षी फेब्रुवारीत कॅमरून यांनी सार्वमत घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर चार महिने जोरदार मोहिमा चालल्या होत्या.

व्यापार व सुरक्षेतून एकत्र
२८ देशांची युरोपियन युनियनची स्थापना १९५८ मध्ये झाली. त्यात सदस्य राष्ट्रांत व्यापार व सुरक्षेच्या क्षेत्रात देवाण-घेवाण केली जाते. बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड या देशांनी मिळून संघटनेची सुरुवात केली. पूर्वी युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी असे संघटनेचे नाव होते. पुढे १९९३ मध्ये त्याचे युरोपियन युनियन असे नामकरण करण्यात आले.

सदस्यत्वाला पाठिंबा
सार्वमताच्या काही दिवस अगोदर घेण्यात आलेल्या पाहणीत नागरिकांनी २८ सदस्यीय युरोपियन संघटनेत राहण्याचे पसंत केले होते. सदस्यत्वाच्या बाजूने ५२, तर ब्रेक्झिटसाठी ४८ टक्के जणांनी पाठिंबा दिला होता. इप्सॉस मोरीद्वारे फोनवरून करण्यात आलेल्या पाहणीतून हा दावा करण्यात आला होता. ‘द डेली टेलिग्राफ’, ‘द टाइम्स’च्या पाहणीत संघटनेत राहण्यासाठी ५१ टक्के व विरोधात ४९ टक्के समर्थन असल्याच नमूद करण्यात आले होते. कॉमरेसच्या पाहणीत ५४ टक्के, तर विरोधात ४६ टक्के अशी स्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...