आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतनाच्‍या बदल्‍यात महिलांवर बलात्‍कार करतात सैनिक, सरकारने दिली परवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सुदान - मागील वर्षी दक्षिण सुदान देशातील एका वृत्‍ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्‍का दिला होता. येथील सरकारने देशातील बिकट आर्थिक परिस्थितीमूळे आपल्‍या सैनिकांना वेतन देण्‍यास नकार दिला होता. त्‍याबदल्‍यात सैनिकांना तेथील स्‍थानिक महिलांशी जबरदस्‍तीने संभोग करण्‍याची परवानगी देण्‍यात आली होती. 
 
संयुक्‍त राष्‍ट्र संघटनेच्‍या मानवी हक्‍क आयोगाच्‍या अहवालामध्‍ये याबद्दल खुलासा करण्‍यात आला आहे. ऑक्‍टोबर 2015 ते मार्च 2016 या कालावधीत तेथे 1300 महिलांवर अशाप्रकारे बलात्‍कार करण्‍यात आला आहे. दक्षिण सुदान हा आफ्रिका खंडातील नवा देश आहे. सुदान या राष्‍ट्रापासून तो वेगळा करण्‍यात आला आहे. निर्मितीपासूनच या राष्‍ट्राला गृहयुध्‍दाच्‍या समस्‍येने ग्रासलेले आहे. दक्षिण सुदानमधील गृहयुध्‍दाच्‍या संघर्षात आतापर्यंत 50 हजार नागरिक मारले गेले आहेत तर 22 लाखांपेक्षा जास्‍त नागरिक निर्वासित झाले आहेत. 
 
संयुक्‍त राष्‍ट्रच्‍या मानवी हक्‍क आयोगाच्‍या अहवालानूसार दक्षिण सुदानमध्‍ये मुलभूत मानवी हक्‍कांची सर्रासपणे पायमल्‍ली होत असते. सरकारविरोधात मत व्‍यक्‍त करणाऱ्यांना अत्‍यंत क्रुर पध्‍दतीने टॉर्चर केले जाते. त्‍यांना शिपिंग कंटेनरमध्‍ये मृत्‍यू होईपर्यंत कोंडले जाते, झाडांवर फाशीला लटकवले जाते किंवा त्‍यांचा शिरच्‍छेद केला जातो. हे अत्‍याचार एवढयावरच थांबत नाहीत तर पालकांसमोर मुले आणि मुलींवर बलात्‍कार केला जातो आणि त्‍यांना हे पाहण्‍याची जबरदस्‍ती केली जाते. 
 
दक्षिण सुदान हा असा एकमेव देश आहे, जिथे सरकार सैनिकांना वेतनाच्‍या बदल्‍यात नागरिकांची संपत्‍ती चोरण्‍याची आणि महिला व मुलींवर बलात्‍कार करण्‍याची परवानगी देते.  
 
पुढील स्‍लाईडवर पाहा,  घटनेचा SHOCKING व्हिडिओ आणि फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...