आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागे बाळाला बसवून ड्रायव्हिंग सीटवर करत होते \'ते\' काम, अचानक घडले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या राजधानीत एक अजब अपघात घडला. जे पाहून स्थानिकही चक्रावले आहेत. यात एक भरधाव कार झाडावर आदळली. पण, स्थानिकांच्या आश्चर्याचे कारण काही औरच होते. कार झाडाला आदळताच त्यातून एक तरुण बाहेर आला. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. यानंतर जी तरुणी बाहेर आली तिची अवस्था देखील अशीच होती. लोकांना त्यांना पाहताच पोलिसांना फोन लावला. जवळच असलेल्या पोलिसांचे सायरन ऐकताच ते दोघे कारमध्ये काही तरी मिळेल का ज्याने पोलिस येण्यापूर्वी अंग झाकता येईल याची धडपड करत होते. तेवढ्यात लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. अपघातग्रस्त कारच्या बॅक सीटवर एक 3 महिन्यांची चिमुकली होती. 

 

> अपघातातील तरुणाचे नाव मायकल टोंकिन असून तो 23 वर्षांचा आहे. तर अपघातातील तरुणी डेझीचे वय सुद्धा तेवढेच आहे. कारच्या मागच्या सीटवर बेल्ट बांधून बसवण्यात आलेली चिमुकली त्यांचीच मुलगी होती. 
> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत आलेली नाही. तसेच चिमुकली सुखरूप आहे. तिला काहीही झालेले नाही. 
> पोलिसांनी पिता मायकलला घटनास्थळावरूनच अटक केली. तो दारू पिऊन गाडी चालवत होता. या कपलने आपण चालत्या कारमध्ये संबंध बनवत असल्याचे मान्य केले. मायकलने सांगितल्याप्रमाणे, ती सुद्धा चालत्या कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर आली होती. समोरचे काहीच न दिसल्याने कार झाडावर जाऊन आदळली. 
> पोलिसांनी मायकल विरोधात दारू पिऊन गाडी चालवणे, निष्काळजीपणा आणि बाळाचे जीव धोक्यात टाकणे इत्यादी कलमा लावल्या आहेत. तर आई डेझी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...