आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Couple Married On Plane To Seattle Plane Passengers Double As Wedding Guests

पैशांचा तुटवडा: विमानातच उरकून घेतला विवाह, प्रवाशी बनले वराती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन दिएगो- नवदांपत्य सेलिब्रेशनसाठी हवाई प्रवास करतात. परंतु, अमेरिकेचे हे जोडपे अपवाद म्हणायला हवे. कारण त्यांच्याकडे विवाहासाठी पैसेही नव्हते. त्यामुळे त्यांनी विमानातच विवाह करण्याचा निर्णय घेतला.

डिना आणि चार्ल्स अशी त्यांची नावे असून ते दोघे दहा वर्षांपासून सोबत राहतात. दोघेही एअरलाइन्सच्या ग्राऊंट स्टाफमध्ये अतिशय कमी पगारावर नोकरी करतात. दोघांवर 35 हजार पौंडचे शैक्षणिक कर्जही आहे. म्हणूनच त्यांनी साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. विमान कंपनी जेटब्लूने देखील आनंदाने त्यांच्या विवाहाला परवानगी दिली. मग काय कर्मचाऱ्यांनी विवाहाची सर्व तयारी केली. एका प्रवाशाने सेक्सोफोन वाजवला आणि इतर पाहुण्यांची उणिवही दूर केली. आम्ही सॅन दिएगोमध्ये विवाह करण्याचे ठरवले होते. परंतु स्टाफने अगोदरच विमानात सर्व तयारी पूर्ण करून ठेवली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, विमानात पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो...