आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायंकाळी लग्न तर सकाळी मृत्यू, काही क्षणाआधीच आईने शेयर केले होते हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 वर्षाचा ऑस्टिन वेसन आणि 19 वर्षाची रेबेका बोमा... - Divya Marathi
30 वर्षाचा ऑस्टिन वेसन आणि 19 वर्षाची रेबेका बोमा...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेतील कन्सास शहरात एका नवविवाहित जोडप्याचा लग्नाच्या दुस-याच दिवशी एका रोड अपघातात मृत्यू झाला. 30 वर्षाचा ऑस्टिन वेसन आणि 19 वर्षाची रेबेका बोमा या दोघांचे शुक्रवारी सायंकाळी लग्न झाले होते. दुस-या दिवशी सकाळ होताच हे दोघे लॉन्ग ड्राईववर निघाले आणि रस्त्यात अपघातात मृत्यूमुखी पडले. सकाळीच आईने फेसबुकवर शेयर केले होते दोघांचे फोटोज...
 
- ऑस्टिन वेसन आणि रेबेका बोमाने शुक्रवारी सायंकाळी सेडविक काउंटी कोर्ट हाउसमध्ये लग्न केले. 
- शनिवारी सकाळी वेसन आणि बोमाने लॉन्ग ड्राईववर जाण्याचा प्लॅन बनवला आणि फोर्ड पिकअप कारमधून रवाना झाले. 
- या दरम्यान सॅडविक काउंटीतील क्लियरवॉटरजवळ कार एका झाडाला जाऊन धडकली. 
- रस्त्यावरून जाणा-या एका व्यक्तीची जेव्हा कारवर नजर पडली तेव्हा कारमध्ये वेसन आणि बोमा रक्ताने नहाले होते.  त्याने याबाबतची माहिती पोलिस आणि अॅम्बुलन्सला दिली. 
- दोघांना तेथील रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. 
- त्या दोघांच्या मृत्यूआधी काही क्षण बोमाच्या आईने दोघांचे फोटोज फेसबुकवर शेयर केले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वेसन आणि बोमाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...