आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Couples Participate In Wife Carrying World Championships

PHOTOS : प्रेमासाठी वाट्टेल ते, बायको खांद्यावर घेऊन धावण्याची अनोखी स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पर्धेची काही क्षणचित्रे. - Divya Marathi
स्पर्धेची काही क्षणचित्रे.
फिनलँडच्या सोनकाजारवीमध्ये नुकतीच एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली. पुरुष आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला खांद्यावर उचलून धावण्याची ही स्पर्धा होती. या स्पर्धेत कपल्सनी 253.5 मीटर चे अंतर कापले. त्यात त्यांना नदी, हर्डल्स (अडथळे) आणि चिखलामधून धावावे लागले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातून कपल्स आले होते. विल्ले पार्वियानेन आणि सारी विल्जानेन यांनी ही स्पर्धा जिंकली.

स्पर्धेची मूळ सुरुवात फिनलँडमधूल झाली आहे. यात पुरुष स्पर्धकांना आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला खांद्यावर घेऊन कमीत कमी वेळात सर्व अडथळे पार करत शर्यत पूर्ण करावी लागते. या दरम्यान जर पत्नी खाली पडली तर तिला खांद्यावर घेऊन पुन्हा सहभागी होण्याची संधी दिली जाते. पण केवळ कमीत कमी वेळात अंतिम स्थानापर्यंत पोहोचून विजय मिळतो असे नाही. तर या संपूर्ण स्पर्धेत चांगला पोशाख आणि सर्वाधिक मनोरंजक ठरलेली जोडी विजयी होते.

स्पर्धेचे अनेक नियमही आहेत. यात केवळ ४९ पेक्षा अधिक वजन असलेल्या महिलाच सहभागी होऊ शकतात. तसेच त्यांचे वयही 17 पेक्षा अधिक असायला हवे. अशा प्रकारच्या इव्हेंट्समुळे नाते अधिक घट्ट होत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अनोख्या स्पर्धेचे काही PHOTOS