आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crazy Russian Traveller Who Traveled 107 Countries In World

आदिवासी, मगरींबरोबरही राहिला, प्यायला प्राण्यांचे रक्त, वाचा या अवलियाचे अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या 4 वर्षांमध्ये फिरला 107 देश. - Divya Marathi
गेल्या 4 वर्षांमध्ये फिरला 107 देश.
मॉस्को - रशियाचा हा 21 वर्षीय तरुण अत्यंत अनोखे जीवन जगत आहे. गेल्या 4 वर्षांमध्ये पिछले यासिक स्मिर्नोफ 107 देशांमध्ये फिरला आहे. त्यादरम्यान तो कधी सुंदर तरुणी, कशी अनोळखी प्रवासी तर कधी मगरींबरोबरही राहिला आहे. तो स्वतःला क्रेझी रशियन असे संबोधतो.

मगरीबरोबर आंघोळ
त्याने सांगितले की, इथोपियाच्या एका तलावामध्ये त्याने मगरींबरोबर आंघोळ केली होती. एकदा तर तो ज्वालामुखीमध्येही पडता पडता वाचला होता. तर एकदा तो एका वाळवंटामध्ये हरवला देखिल होता.

त्याचे म्हणणे आहे की, प्रवासादरम्यान आपण केवळ एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नसतो तर त्याठिकाणच्या लोकांसारखे वागण्याचाही प्रयत्न करत असतो. त्या या दरम्यान विविध ठिकाणी पार्ट टाइम कामही केले. वयाच्या 18 व्या वर्षीच पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्याने जगभर फिरण्याचा प्रयत्न केला होता.

प्राण्यांचे रक्तही प्यायला
एका आदिवासी जमातीबरोबर राहताना तो प्राण्यांचे रक्तही प्यायला होता. आफ्रिकेच्या देशांबरोबरच त्यानेल तिबेट, मेक्सिको, जॉर्डन, ऑस्ट्रेलियासह इतर ठिकाणांचा दौराही केला. त्याने वयाच्या 15 व्या वर्षीच सायबेरियामध्ये घर सोडले होते. नंतर त्याने हाँग काँगमध्ये लग्न केले आणि स्वतःचा व्यवसायही सुरू केला.

सर्वात भयावह...
त्याने अनुभव व्यक्त करताना सांगितले की, त्याचा सर्वात भयावह अनुभव हा मगोलियाच्या वाळवंटात जेव्हा तो दोन दिवस रस्ता हरवला होता तेव्हाचा होता. त्यादरम्यान त्याच्याकडे पाणी नव्हते की खायलाही काही नव्हते. नंतर एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीने तो परतला.

पुढील स्लाइड्सवर पाहा या क्रेझी रशियनच्या पर्यटनाचे PHOTOS