आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोच्या आयलंडची HORROR स्टोरी, बाहुल्या करतात पर्यटकांना इशारे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिकोमधील भयावह बाहुल्यांचे आयलंड. - Divya Marathi
मेक्सिकोमधील भयावह बाहुल्यांचे आयलंड.
तुम्हाला जर हाँटेड जागा पाहायची हौस असेल तर हे आयलंड जणू तुमच्यासाठीच आहे. मेक्सिकोचे डॉल्स आयलंड. एकेकाळी हे आयलंड अतिशय सुंदर होते. पण आज या भयावह डॉल्सने यावर ताबा मिळवलाय. मेक्सिको सिटीच्या दक्षिणेला जोचिमिको कॅनॉलमध्ये एक छोटेसे बेट आहे. 2001 पासून हे चांगलेच चर्चेत आले. त्याचे कारण म्हणजे या बयावह डॉल्स. या बेटावर सगळीकडे या बाहुल्या लटकलेल्या आपण फोटोत पाहू शकता. 1990 मध्ये जोचिमिको कॅनॉलच्या सफाईदरम्यान हे बेट नजरेस पडले. त्यानंतर माध्यमांनी याची दखल घेतली.

हे बेट ला इस्का डे ला म्यूनेकस नावाने ओळखले जाते. ते पर्यंटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले असले तरी, गाईडशिवाय येथे फिरणे जवळपास अशक्यच आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये मात्र या आयलंडला धोकादायक ठरवण्यात आलेले नाही. स्थानिकांच्या मते येथे झाडावर लटकलेल्या शेकडो बाहुल्या एकमेकांशी बोलातात. त्यांच्यामध्ये भुताचा वास असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. या बाहुल्या इशारा करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात असेही काही लोक सांगतात. तर काही लोकांनी या बाहुल्यांचे डोळे फिरत असल्याचेही म्हटले आहे.

सुरुवातीपासून हे आयलंड असे नव्हते. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी याठिकाणी एक सर्वसाधारण आयलंड होते. मग याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहुल्या आल्या कुठून, आणि त्या बाहुल्या अशा लटकवण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामागची कथाही अत्यंत रंजक आहे.

बाहुलीत मुलीची आत्मा?
स्थानिकांच्या मते, या बाहुल्यांमध्ये एका लहान मुलीची आत्मा आहे. तिचा गूढ मृत्यू झाला होता. डॉन ज्युलियन सॅन्टाना बरेरा 2001 पर्यंत या बेटाचा केअर टेकर होता. तो याठिकाणी एकटा राहायचा. त्याच्या मृत्यूनंतर हे आयलंड भयावह बनले. ज्युलियनला एका मुलगी पाण्यावर तरंगताना आढळली होती. त्यावेळी ती जीवंत होती. पण ज्युलियनला त्याला वाचवण्यात यश आले नाही.

असे सांगितले जाते की, मुलीच्या मृत्यूनंतर एक बाहुलीही वाहत त्याठिकाणी आली. ज्युलियनने ती त्यामुलीची बाहुली आहे असे समजून ज्याठिकाणी मुलीने प्राण सोडले होते, त्याच झाडावर ती बाहुली लटकवली. पण त्यानंतर ज्युलियनला एकापाठोपाठ एक अनेक बाहुल्या मिळत होत्या. त्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तो एकापाठोपाठ या बाहुल्या येथील झाडांवर लटकवत गेला, असे ज्युलियननेच एकदा सांगितले होते. लोकांच्या मते ज्युलियनला त्या मुलीला वाचवू न शकल्याचे शल्य होते.

याठिकाणी असलेले स्थानिकांचा भुतासारख्या शक्तींवर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे. लोकांच्या मते, ज्याठिकाणी या मुलीचा मृत्यू झाला होता, त्याचठिकाणी ज्युलियननेही प्राण सोडले होते. त्यामुळे लोकांचा यो गोष्टीवरील विश्वास वाढू लागला. लोकांच्या मते येथे बाहुल्यांनी आज त्यांचे एक स्वतंत्र जग निर्माण केले आहे. त्यांच्यामध्ये आत्मांचा वासही आहे. या बाहुल्या लोकांना इशारे करून त्यांच्याकडे बोलावतात असे म्हटले जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या भयावह डॉल्सच्या आयलंडचे PHOTOS...