आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात जास्त गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध आहे हा देश, अपराध करण्यासाठी गँग्स करतात लहान मुलांचा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - ब्राझील 7 सप्टेंबर, 1822 रोजी स्वतंत्र झाला. हा देश जगातील सर्वात मोठे टुरीस्ट डेस्टीनेशनपैकी एक आहे. पण आता हा देश अपराधांच्याबाबतीतही अग्रणी स्थानावर आहे. येथे मर्डर, ड्रग्स तस्करी आणि चोरी या सर्व गोष्टी नेहमीच्याच झाल्या आहेत.  इतकेच नाही तर देशातील गँग्स मोठे मोठे अपराध करण्यासाठी लहान मुलांचा वापर करतात. कारण कमी वय असल्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही. देशाच्या  22 शहरात होतो सर्वात जास्त क्राईम...
 
मेक्सिको पब्लिक सिक्युरिटी एंड क्रिमिनल जस्टिस सेंटर द्वारा प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, ब्राझीलमधील 22 शहरे केवळ क्राईमसाठी ओळखले जातात. हा आकडा इतर देशांच्या तुलनेत फार जास्त आहे. 
- यूएनने दिलेल्या रिपोर्टनुसार, 1979 ते 2003 मध्ये जवळपास 5 लाख लोकांचा मर्डर झाला आहे. यात सर्वात जास्त मृत्यू गँगवॉरमध्ये झाला आहे.  येथे एक लाख लोकसंख्येमागे 35 पुरुष आणि 48 महिलांचा मर्डर होतो. 
 
ड्रग्स डीलिंग मध्ये असतो लहान मुलांचा सहभाग..
- यूएनने दिलेल्या रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये ड्रग्स आणि हत्यारांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. त्यासाठी लहान मुलांचा जास्त वापर होतो. कारण लहान मुलांवर कोणी लवकर संशय घेत नाही तसेच ते पकडले जरी गेले तरी खूप मोठ्या कालावधीसाठी त्यांना तुरुंगात जावे लागत नाही. 
 
किडनॅपिंग आणि ह्युमन ट्रॅफिकींगही आहे नेहमीचेच... 
- ड्रग्ज स्मगलिंग आणि अपहरण यांसारख्या गोष्टी येथे नेहमीच घडतात. मेट्रो सिटीजमध्ये असे अनेक गँग्ज आहेत जे हे सर्व काम करतात. 
पब्लिक फेस्टीवल आणि रियो डि जेनेरियो सिटीमध्ये दरवर्षी होणारे कार्निव्हल फेस्टीव्हलमध्ये सर्वात जास्त अपहरण होतात. मुलांना गँग्समध्ये घेतले जाते तर मुलींना वैश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. 
 
घरगुती हिंसाचारही आहे मोठ्या प्रमाणात..
- गवर्मेंट स्पॉन्सर्ड स्टडीनुसार, 10 ते 15 महिलांच्या खूनाचे प्रकरण रोज समोर येते. 1997 ते 2007 मध्ये ब्राझीलमध्ये 41,532 महिलांची हत्या झाली. यातील अनेकजण घरगुती हिंसाचाराने पीडित होती. याशिवाय येथे काही अश्वेत लोकांची हत्या आणि महिलांवर बलात्काराचे प्रकरणेही समोर आले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अपराधांसाठी बदनाम आहेत ब्राझीलचे हे काही सिटीज्, असा असतो नजारा...
बातम्या आणखी आहेत...