आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रगीतावेळी हृदयावर हात न ठेवल्याने ट्रम्प यांच्यावर टीका!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक घडामोडींवर सोशल मीडियाचे लक्ष असते. त्यांच्याकडून नकळत घडलेली चूकही त्यांना चर्चेत आणते. ईस्टर मंडे रोजी आयोजित ईस्टर एग रोल कार्यक्रमातही काहीसे असेच घडले.
 
या वेळी अमेरिकेच्या राष्ट्रगीताची धून सुरू झाली. मात्र, ट्रम्प पद्धतीप्रमाणे छातीवर हात ठेवायला विसरले. त्यांची पत्नी मलानिया आणि मुलगा बॅरन यांनी मात्र हृदयावर हात ठेवले होते. ही बाब लक्षात येताच मलानिया यांनी ट्रम्प यांना कोपऱ्याने मारत चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी लागलीच चूक सुधारली. मात्र, तोपर्यंत ट्विटरवरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता.
 
एका व्यक्तीने टीकेत म्हटले की, ट्रम्प यांना राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्राची किती काळजी आहे हे दिसून येते. दरम्यान, राष्ट्रगीतावेळी हृदयावर हात न ठेवल्याने ज्यांना वाटत होते की, ओबामा देशद्रोही आहेत. त्यांना आता ट्रम्प देशद्रोही-२ वाटतात काय, असा प्रश्न जोको सिम्स यांनी ट्विटरवरून विचारला आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीपासून सातत्याने वादात आहेत.
बातम्या आणखी आहेत...