आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cuba Succeed To Stop Infection Of HIV From Mother To Her Child

मातेकडून बाळाचा एचआयव्ही संसर्ग रोखला, क्युबा ठरला जगातील पहिला देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - एचआयव्हीबाधित आईच्या पोटी जन्मलेल्या बालकाला जन्मताच होणारा एड्सचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यात क्युबाने यश मिळवले असून हे क्रांतिकारी यश मिळवणारा तो जगातील पहिला देश ठरला आहे. याशिवाय सिफिलिससारख्या लैंगिक आजाराची आईकडून मुलांना होणारी बाधा थांबवण्यातही या देशाला यश आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या देशाने व्यापक स्तरावर मिळवलेले हे पहिलेच यश आहे. आता या देशात सर्वत्र एड्समुक्त पिढी जन्माला येत आहे.

मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती संपवणाऱ्या एड्ससारख्या जीवघेण्या अाजाराने गेल्या २५ वर्षांत अनेक देशांत पिढ्या बाधित केल्या आहेत. एचआयव्हीबाधित आईकडून जन्मताच मुलांना होणारी या भयंकर रोगाची बाधा होण्याचे प्रमाणही जगभरात वाढत चालले होते. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही क्युबामध्ये एक राष्ट्रीय समस्या बनली होती. या समस्येपासून क्युबाने मुक्ती मिळवली आहे.

जगातही एड्सबाधित मुलांचे प्रमाण आता कमी
- जन्मताच एड्स बाधा असलेल्या मुलांचे प्रमाण २००९ पासून कमी होत आहे.
- २००९ मध्ये ४ लाखांवर असलेले हे प्रमाण २०१३ मध्ये २.४ लाखांवर आले.

सिफिलिसचाही नायनाट
क्युबात सिफिलिसमुळे गर्भवतींमध्ये आरोग्य समस्या निर्माण होत होत्या. शिवाय नवजातांमध्ये याचा संसर्ग होत असे. यावरही क्युबाने नियंत्रण मिळवले. यामुळे मृत अर्भकाचा जन्म, नवजात अर्भकाचे मृत्यू, कमी वजनाची नवजात बालके या समस्यांपासून या देशाला आता मुक्ती मिळाली आहे.

भारतात...
- अारोग्य मंत्रालयाने २००२ पासून मातेपासून नवजात अर्भकांना होणारी एड्सबाधा थांबवण्यासाठी विशेष कार्यक्रम (पीपीटीसीटी) हाती घेतला.
- २०१२ मध्ये २.७० कोटी गर्भधारणा झालेल्या महिलांत ३४,६७५ एड्सबाधित होत्या. यानंतर जन्मलेल्या १३ हजार अर्भकांना जन्मापासूनच एचआयव्ही बाधा होती.