आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्युबातील २० व्या शतकातील क्रांतीचे नायक फिडेल कॅस्ट्रोंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सँटियागो दे क्युबा : क्युबातील २० व्या शतकातील क्रांतीचे नायक फिडेल कॅस्ट्रो यांच्या पार्थिवावर रविवारी १९ व्या शतकातील क्युबाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नायक होसे मार्ती यांच्या स्मृतिस्थळाजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.
सांता इफेगोनियातील कब्रस्तानात अत्यंत खासगी आणि साध्या समारंभात अंत्यसंस्कार पार पडले. तत्पूर्वी संपूर्ण देशाने फिडेल यांना श्रद्धांजली वाहिली. फिडेल यांचे पार्थिव ग्रीन आर्मीच्या जीपमधून सुमारे १ हजार किमीचा प्रवास करून सेंटियागो येथे पोहोचले. संपूर्ण प्रवासात हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

फिडेल यांचे धाकटे भाऊ आणि क्युबाचे अध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांनी घोषणा केली की, देशातील कुठलेही संग्रहालय, इमारत किंवा रस्त्याला फिडेल यांचे नाव दिले जाणार नाही. फिडेल यांचीच ती अंतिम इच्छा होती. फिडेल यांच्या क्रांतिकारी आणि साम्यवादी वारशाचे रक्षण करू, असा निर्धार व्यक्त करून राउल म्हणाले की, फिडेल यांना कोणीही पराभूत करू शकले नाही. ते अजेय राहिले.

क्युबाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे २५ नोव्हेंबरला निधन झाले होते. ते ९० वर्षांचे होते. फिडेल यांच्या अंत्यसंस्काराला जगातील अनेक नेते उपस्थित होते. त्यात बोलेव्हियाचे अध्यक्ष इव्हो मोरालेस, निकारागुआचे नेते डॅनियल ओर्तेगा, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि ब्राझीलचे दोन माजी अध्यक्ष डिल्मा रूसेफ आणि लुला दा सिल्व्हा यांचा समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...