आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्युबा क्रांतीचे मसीहा फिडेल कॅस्ट्राे काळाच्या पडद्याअाड! पाच दशके केली अमेरिकेची दमछाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील तरुणाईत फिडल यांच्याबद्दल क्रेझ होती. - Divya Marathi
जगभरातील तरुणाईत फिडल यांच्याबद्दल क्रेझ होती.
हवाना - क्युबा क्रांतीचे प्रणेते व ५ दशके अमेरिकी सत्तेला मेटाकुटीस आणणारे क्रां‌तिकारक फिडेल कॅस्ट्रो यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. १९५९ ते १९७६ पर्यंत ते क्युबाचे पंतप्रधान व १९७६ ते २००८ पर्यंत राष्ट्रपती होते. अमेरिका खंडात ते एकमेव कम्युनिस्ट शासक होते.

कॅस्ट्रोंच्या निधनाची घोषणा त्यांचे लहान भाऊ व क्युबाचे राष्ट्रपती राऊल कॅस्ट्रोंनी केली. त्यांनी ९ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. २९ नोव्हेंबर रोजी हवानात विशाल शोकयात्रा निघेल. ४ डिसेंबर रोजी सांत्यागो दी क्युबात अंत्यसंस्कार होतील. येथेच क्युबा क्रांतीची बीजे पेरली होती. शीतयुद्ध टिपेला पोहोचले असताना जागतिक मंचावर कम्युनिस्ट नेते म्हणून कॅस्ट्रोंचा उदय झाला. अमेरिकी मर्जीवर हुकूमशहा झालेल्या फुल्जेंशो बातीस्तांची सत्ता उलथवून ते १९५९ मध्ये सत्तेत आले होते. सोव्हियत रशियाच्या पतनानंतरही आपल्या देशात साम्यवादाची मुळे भक्कम ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. ते जगातील सर्वाधिक काळ शासन करणारे तिसरे नेते होते. थायलंडचे राजे भूमिबल अतुल्यतेज व ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर त्यांचा क्रमांक लागतो.

अमेरिकेच्या ११ राष्ट्रपतींशी टक्कर
अमेरिकेच्या विरोधात ठाम उभा राहणारा नेता अशी कॅस्ट्रोंची ओळख होती. १९५९ च्या क्युबा क्रांतीनंतर अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्रपतीने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे ११ राष्ट्रपती आले आणि गेले. मात्र कॅस्ट्रो सत्तेत कायम राहिले. अमेरिकेने प्रतिबंध लादूनही त्यांनी गुडघे टेकले नाहीत..

जगभरात शाेक, मात्र अमेरिकेत अानंदाेत्सव
फिडेल नावाने प्रसिद्ध फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर क्युबापासून ९० किमी अंतरावर अमेरिकेतील मियामीच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

फिडेल यांचे कुटुंब
- फिडेल यांना 8 मुले आहेत. त्यांच्या ज्येष्ठ मुलामध्ये - डियाज बलार्टमध्ये लोक त्यांची झलक पाहातात. तो फिडेलितो नावाने प्रसिद्ध असून अणुशास्त्रज्ञ आहे.
- हवाना येथील सामाजिक कार्यकर्तीपासून झालेली त्यांची मुलगी एलीना फर्नांडिसने मियामी रेडिओ कार्यक्रमात स्वतः फिडेलला क्रिटिसाइज केले होते.
- फिडेल यांना दुसरी पत्नी डालिया सोटो हिच्यापासून पाच मुले आहेत. त्या सर्वांचे नाव ए अद्याक्षरापासून सुरु होते.
- छोटा मुलगा अंटोनिओ नॅशनल बेसबॉल टीमचा फिजिओ आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, फिडेल यांच्याविषयी आणखी काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...