आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्युरिऑसिटीला मंगळावर ओली माती सापडली, मानवी वसाहतीच्या शक्यता वाढल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन | मंगळावर स्वारी करणाऱ्या नासाच्या क्युरिऑसिटी यानाला या ग्रहावर ओली माती आढळल्याने येथे जवळपास जलसाठे सापडण्याची शक्यता आहे. यामुळे याबाबतच्या संशोधनास नवी दिशा मिळाली असून भावी काळात येथे मानवी वसाहतीच्या योजनेला गती मिळू शकणार आहे.
क्युरिऑसिटीला सापडलेल्या मातीमध्ये कॅल्शियम फ्लोराइड आढळून आल्याने या मातीमध्ये पाण्याला बर्फ करण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या मातीत असलेल्या द्रव पदार्थात मोठ्या प्रमाणात मीठ असल्याचेही क्युरिऑसिटीमध्ये असलेल्या विघटन करणाऱ्या यंत्रणेत दिसून आले आहे.

मंगळावरील माती ठरावीक काळात वातावरणातील पाणी शोषून घेते. विशेषत: रात्री व हिवाळ्यात सूर्योदयानंतर या मातीची क्षमता पाणी शोषून घेणारी असते, अशी माहिती कोपरहॅमन विद्यापीठातील बोहर इन्स्टिट्यूटमधील संशोधक पथकाचे प्रमुख मॉर्टन बो मॅडसेन यांनी दिली.