आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हजारो वर्षांनंतर प्रथमच उघडले इजिप्तचे शापित संदूक, आत सापडले हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटिश पुरातत्ववेदता हॉवर्ड कार्टर आणि त्यांच्या समूहाने 1922 मध्ये इजिप्तचा शापित संदूक खणून बाहेर काढताच जगभरात खळबळ उडाली होती. हे संदूक 3340 वर्षे प्राचीन राजा तूतनखामनचे होते. ते उघडताच अनर्थ होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. अखेर पेटी सापडल्याच्या 90 वर्षांनंतर ती उघडण्यात आली आहे. यात सुवर्ण पत्र, घोड्याचे लगाम, बाण ठेवण्याचे चामडी पॉकेट आणि प्राचीन लिपी सापडल्या आहेत. 

 

शास्त्रज्ञ काय म्हणतात?
> खजिन्याबद्दल बोलावयाचे झाल्यास त्यामध्ये सोन्याचे पत्रे तुटलेल्या अवस्थेत सापडले आहे. त्या पत्र्यांवर सांकेतिक भाषांमध्ये संदेश आहेत. ते जोडून पाहिल्यास एक जीवन वृक्ष दिसून येतो. आणि त्या वृक्षावर बकऱ्या आणि विविध प्रकारचे प्राणी द्वंद्व करताना दिसत आहेत. 
> जर्मन विद्यापीठातील प्राध्यापक पीटर फॅल्झनर यांनी सांगितल्याप्रमाणे, या लिपी इजिप्तमध्ये परदेशातून आल्या आहेत. त्या मेसोपोटेमिया या प्राचीन शहरातून सीरिया मार्गे इजिप्तमध्ये आल्या होत्या. प्राचीन काळात शम्स / लेवंट (आताचा सीरिया आणि इराक) ने माहितीचा प्रसार करण्यात किती मोलाची भूमिका निभावली त्याचे हे पुरावे आहेत. 
> संशोधक फॅल्झनर आणि त्यांचे सहकारी आता या पेटीचे प्रमुख संशोधक बनले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली पेटीतील खजिन्याचा सविस्तर अभ्यास सुरू आहे. त्यांच्या संशोधनानुसार, त्यावेळी इजिप्तमध्ये 500 टन वजनी माल आणि दगड परदेशातून आणण्याची व्यवस्था होती. 


शापित का? 
> 1922 मध्ये डॉ. कार्टर आणि त्यांच्या समूहाने तूतनखामनच्या कब्रीजवळून ही संदूक बाहेर काढली होती. त्यावेळी संदूक उघडण्यास विरोध झाला होता. 
> तरीही, कार्टर आणि त्यांच्या संशोधक समूहातील काहींनी ते उघडून पाहिले आणि एकानंतर एक मृत्यूची मालिकाच सुरू झाली. संदूक काढले तेव्हापासून आतापर्यंत ते कुणालाही पाहण्याची परवानगी नव्हती.
> कार्टर यांच्या समूहाने आपल्या प्रयोगशाळेत त्यातील सुवर्ण पत्र आणि इतर सांकेतिक भाषांच्या पेंटिंग काढल्या होत्या. त्याच पेंटिंगवरून जगभरातील शास्त्रज्ञ गेल्या 90 वर्षांपासून अभ्यास करत आले. 
> आता हा खजिना आणि पेटीतील सर्वच साहित्य कॅरो येथील संग्रहालयात सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. 


पुढील स्लाइड्सवर, बॉक्समध्ये सापडलेल्या वस्तू...

बातम्या आणखी आहेत...