आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मनीत पुढीलवर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर सायबर हल्‍ल्‍याचे सावट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - देशातील पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काहीशा अस्थिर पार्श्वभूमीवर जर्मनीच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांनी देशात राजकीय अस्थैर्य वा गोंधळ माजवण्याच्या उद्देशाने सायबर हल्ल्यांचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे पुरावे हेच सांगतात की, अमेरिकन निवडणूक प्रचार मोहिमेत हॅकिंगप्रकरणी रशियन सहभागाचे पुरावे आढळले आहेत.

ब्रुनो काहल हे जर्मनीच्या फेडरल इन्टेलिजन्स सर्व्हिसचे प्रमुख आहेत. जगातील अनेक देशांच्या अस्थैर्यात युरोपात अस्थैर्य माजवणे त्यातल्या त्यात जर्मनीत गोंधळ वा राजकीय अस्थैर्य माजविणे हे विरोधकांसह बाह्यशक्ती व अतिरेकी संघटनांचे उद्देश आहेत. अमेरिकन प्रशासन अधिकारी तर आता या निष्कर्षाप्रत आले आहेत की, रशियाच डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या ई-मेलच्या हॅकिंगप्रकरणी जबाबदार आहे. मात्र, रशियाने हे फेटाळून लावले आहे. तथापि, पुरावे हेच निर्देशित करताहेत, असा पुनरुच्चार हेर खातेप्रमुख काहल यांनी केला आहे. अर्थात तांत्रिकदृष्ट्या ते सिद्ध करणे अवघडच असते. हे सर्व स्टेट स्पॉन्सर्ड घडलेले असू शकते. जर्मनीतील निवडणूक पुढील सप्टेंबरात, तर नेदरलँड (हॉलंड) आणि फ्रान्सच्याही निवडणुका लवकरच या वर्षभरात होतील. दबावात न राहता सावध राहावे. अन्यथा सायबर हल्ला वा हॅकिंगच्या प्रकरणातून बाह्यशक्ती अमेरिकेसारखे हवे ते सरकार सत्तेवर आणू शकतात. यापासून जर्मनीसह सर्वच देशांनी सावध राहावे, असे त्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...