आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dad Built 18 Months Transforming Daughter’S Bedroom

दीड वर्षांत आपल्या चिमुकल्या लेकीसाठी पित्याने घरातच उभे केले जंगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांनी बनवलेल्या क्रिएटिव्ह जंगलमध्‍ये लिआ. - Divya Marathi
वडिलांनी बनवलेल्या क्रिएटिव्ह जंगलमध्‍ये लिआ.
वॉशिंग्टन - एका पित्याने आपल्या मुलीच्या प्रेमा खातर काय केले असावे? कन्या लिओने हट्ट केला, की तिच्या बेडरुममध्‍ये अशी झाड हवीत ज्यावर बसून वाचता येईल, त्यांच्या फांद्यांवर चढता येईल आणि जेव्हा ती झोपलेली असेल तेव्हा फांद्या तिच्यावर लोंबकळलेली असावीत. कदाचित तिने परिकथेत हे सर्व वाचले असतील.पिता रेडम शोम व्हिडिओ गेम उद्योगात आहेत. त्यांनी आपली पूर्ण सर्जनशीलता आपल्या मुलीसाठी झाड बनवण्‍यासाठी खर्चले.
कॉंक्रिट आणि वायर स्क्रीनच्या मदतीने झाडाची निर्मिती...
ते म्हणाले, की त्यांनी डिझाइन तयार करुन लोखंडाचा साचा बनवला. मग कॉंक्रिट आणि वायर स्क्रीनच्या मदतीने झाड बनवले. शेकडो लहान फांद्यांवर ख्रिसमस दिवे आणि कृत्रिम फुलपाखरं लावली. या सर्वांनी त्यात जीव फुंकले जसे की ते ख-या झाडाप्रमाणे दिसू लागले. लिआ जेव्हा रुममध्‍ये आली तेव्हा तिच्या आनंदाला पारवार उरला नाही. आता ती आपला सर्वाधिक वेळ त्यातच घालवते. 18 महिन्यांच्या मेहनतीला माझा मित्र रोबने लोकांपर्यंत पोहोचवले. त्याचे आभार, असे रेडम यांनी सांगितले.
हे विशेष
- लोखंडाचा साचा तयार झाल्यानंतर वायर स्क्रीनच्या मदतीने त्यास झाकण्‍यात आले. सहा वर्षांची लिआ आपल्या पित्याला प्रोत्साहन देत राहिली.
- त्याच्या फ्लोरिंगसाठी कापड पसरवले आणि त्यास हार्डवूडने झाकले. शेरविन विलम्सच्या 12 रंगांचा वापर केला. यानंतर चकाकीसाठी ग्लास फिनिश दिली.
- रेडम शोमने प्रथम त्याचे छोटी प्रतिकृती बनवली आणि त्या वस्तू जमवले जी झाडासाठी आवश्‍यक असतात.
- घरटी, पक्षी आणि फुलपाखरही लावली. याने सर्व खरे वाटावे. झाड आहे म्हटल्यावर पक्षी येणारच ना.
वेल्डिंग आणि कॉंक्रिटसाठी प्रशिक्षण
लिआचे पिता रेडम शोम यांना अशा प्रकारच्या कामाची सवय नव्हती. त्यांनी सर्व कामांचे प्रशिक्षण घेतले. मुलीसाठी त्यांनी दीड वर्षांपर्यंत दिवसरात्र त्यात खर्च केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...