आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधू संशोधनाची दिली पानभर जाहिरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - अमेरिकेच्या एका वृत्तपत्रात अनोखी पूर्ण पानाची जाहिरात पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. ही जाहिरात ४८ वर्षीय उद्योजक बेरॉन ब्रुक्स यांच्यासाठी वधू संशोधनाचा एक भाग आहे. ही कल्पना आहे उद्योजकाचे ७८ वर्षीय वडील आर्थर ब्रुक्स यांची. जाहिरातीत काही अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत. त्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे. यशस्वी होणाऱ्या महिलेचा बेरॉन यांच्याशी विवाह होईल. नॉर्थ इदाहो नावाच्या वृत्तपत्रात प्रकाशित या जाहिरातीत काही अटी आहेत. त्यात वय, उंची, राजकीय मुद्द्यांवरील दृष्टिकोनातील साम्य इत्यादी मुद्द्यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ तुम्ही आेबामांना मतदान केले होते की हिलरींना मतदान करणार असल्यास मला तुमची गरज नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. जाहिरातीवर सुमारे ६० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सॉल्ट लेक सिटीमध्ये राहणारे दोन फूड स्टोअरचे मालक बेरॉन म्हणाले, वडिलांनी मला काहीही कल्पना न देता हे काम केले आहे. मला खूपच लाजिरवाणे वाटू लागले आहे. त्यांच्या या कृतीने मला खूपच दु:ख वाटू लागले आहे. मला त्यांच्या भावनांना दुखवायचे नाही. म्हणूनच मी कॅलिफोर्नियात राहणाऱ्या वडिलांना योग्य उमेदवाराची मुलाखत घेण्यास सांगितले आहे. शनिवारी यासंदर्भात मुलाखती होतील. आर्थर म्हणाले, रविवारपर्यंत मी काहीही बोलणार नाही. कदाचित तोपर्यंत आपल्या सुनेबाबतचा निर्णय पूर्ण झालेला असेल. बेरॉन म्हणतात, वडील सणकी व आक्रमक आहेत. मनात आल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना गप्प बसवत नाही. मी केलेले योग्य आहे, असे त्यांना वाटू लागते. ते अलीकडे आजारी पडू लागले आहेत. त्यांना नातवंडांना पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. जेणेकरून वंश पुढे जाऊ शकेल.

छोट्या वृत्तपत्रात जाहिरात दिल्यावरून बेरॉन म्हणाले, अलीकडेच सुट्या घालवण्यासाठी ते या भागात गेले होते. पारंपरिक विचारसरणीवर जगणारे लोक या भागात राहतात. मी देखील त्याच विचारांचा आहे. म्हणूनच त्यांनी छोट्या भागातून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातून जाहिरात प्रकाशित केली आहे.

लुकिंग फॉर अ वाइफ
जाहिरातीचे शीर्षक ‘लुकिंग फॉर अ वाइफ’ असे आहे. बेरॉन यांच्याबद्दल काही गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. छायाचित्रात दिसतो, तसाच वास्तवातही आहे. केस भुरकट आहेत. लवकर मूल होऊ देण्याची तयारी असलेल्या महिलेचा शोध आहे. उमेदवारास गृहिणी म्हणून राहावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...