आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्ट्रीय कोर्टात ब्रिटनला धक्का, भारताचे दलबीर भंडारी पुन्हा झाले जज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रे- संयुक्त राष्ट्रांत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या पाच राष्ट्रांवर भारताने कूटनीतिपूर्वक विजय मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या ७१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ब्रिटनला बाहेर करत भारताचे दलबीर भंडारी पुन्हा न्यायमूर्ती झाले. आयसीजेत विजय मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभा व सुरक्षा परिषदेतही बहुमत लागते. महासभेत भंडारी यांना बहुमत होते. मात्र, सुरक्षा परिषदेत १५ पैकी ९ सदस्यांचा ब्रिटनचे क्रिस्टोफर ग्रीनवुड यांना पाठिंबा होता. निकालाप्रत पोहोचण्यासाठी वारंवार मतदान सुरू होते. ११व्या फेरीत भंडारी यांना महासभेत सुमारे दोनतृतीयांश मते पडली. पण, सुरक्षा परिषदेत ब्रिटनचेच वर्चस्व होते. निकालाचा अडथळा दूर होत नसल्याचे पाहून ब्रिटनने १२व्या फेरीच्या ऐन तासाभरापूर्वी उमेदवार मागे घेतला. त्यानंतर भंडारी यांना महासभेत १९३ पैकी १८३, तर सुरक्षा परिषदेत सर्व १५ सदस्यांची मते पडली. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत असून त्यानंतरचा कार्यकाळ पुढील ९ वर्षांसाठी असेल.


मतदानाच्या तीन तासांपूर्वीपर्यंत होता दबाव
बाराव्या फेरीच्या मतदानाच्या ३ तास आधी महासभा अध्यक्ष मिरोस्लाव्ह लॅझकक व सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष सेबस्टियानो कार्डी यांनी संयुक्त राष्ट्रांतील ब्रिटनचे प्रतिनिधी मॅथ्यू रिक्रॉफ्ट व भारताचे सय्यद अकबरुद्दीन यांच्याशी चर्चा केली. ब्रिटन संयुक्त सभेवर अडून होता. नंतर घटनाक्रम बदलला. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन व संयुक्त राष्ट्रांतील राजदूत भारतवंशीय निक्की हेली यांच्याशी चर्चा केली. मतदानाच्या तासाभरापूर्वी ब्रिटनने त्यांचा उमेदवार मागे  घेतला.


>भंडारींचा सध्याचा कार्यकाळ १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. दुसरा ९ वर्षांचा असेल.


जुनमध्येच सुरू केली होती मोर्चेबांधणी
नरेंद्र मोदी :
जुलैमध्ये ब्रिक्स संमेलनापासून मोर्चेबांधणीस सुरुवात. चीनी राष्ट्रपतींची मनधरणी केली. सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्य राष्ट्रांशी चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या १०० हून अधिक सदस्यांना पत्र लिहून पाठींबा मागितला.
सुषमा स्वराज : स्वराज यांनी  ६० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. त्यांच्या मार्गदर्शनात परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत अकबरूद्दीन यांच्या चमूने रणनिती आकारास आणली.
एम.जे. अकबर :  मोदींचे पत्र घेऊन अनेक देशांत गेले. इजिप्तच्या राष्ट्रपतींना भेटले.  सेनेगल या लहानग्या देशाच्या राष्ट्रपतींसह घानाच्या उच्चायूक्तांचीही भेट घेतली. 
ब्रिटीश मीडिया  : द इंडिपेंडट :  ब्रिटनचे महत्व कमी आणि भारताचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. ज्या संस्थेच्या स्थापनेत ब्रिटनने सहकार्य केले होते. त्यातून बाहेर पडणे हे यूरोपियन यूनियन सोडल्याच्या निर्णयानंतर जागतिक स्तरावर ब्रिटनचे महत्व कमी होत आहे. विकसनशील अर्थव्यवस्थेच्या रुपात भारताचे वर्चस्व वाढताना दिसत आहे .

बातम्या आणखी आहेत...