आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच फाइट अन् वधू जखमी : अत्यानंदात नवरदेवाच्या डान्सचा प्रताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- विवाह सोहळ्यात नाच-गाण्याचा कार्यक्रम होणे हा आनंद साजरा करण्याचा एक प्रकार असतो. परंतु एका जोडप्यासाठी हाच प्रकार लक्षात राहणारी आठवण ठरला. यू ट्यूबवर लग्नाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यात नवरदेवाच्या एका चुकीमुळे वधूला चक्क रुग्णालयात भरती करावे लागले.

या व्हिडिओला सध्या खूप लाइक्स मिळत आहेत. लग्नाचा अत्यानंद वर - वधू पाहुणे मंडळींसमोर नृत्य करून साजरा करू इच्छित होते. तसे वातावरण देखील होते. गाणे, म्युझिक सुरू होते. रिसेप्शन हॉलमध्ये एंट्री करताच नवरदेवाने सर्वप्रथम त्याचा कोट काढला. वधूसमवेत नाचतच तो डान्स फ्लोअरकडे गेला.

कलाबाजी करणे पडले महागात
नवरदेवाने अत्यानंदात डान्स सुरू केला. वधू जवळच उभी राहून त्याच्या कसरती बघत होती. उडी मारून नृत्य करताना नवरदेवाचे संतुलन बिघडले व त्याची जबरदस्त लाथ तिच्या तोंडावर बसली. ती जमिनीवर खाली कोसळली व वेदनेने विव्हळू लागली. पाहुणे मंडळी तिच्या मदतीला धावली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, वधूला सांभाळू शकला नाही तरुण