आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे पलायन करताहेत रोहिंग्या मुस्लिम, त्यात अशी जिवघेणी वाट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारातून आपला जीव वाचवत लाखो रोहिंग्या मुस्लिमांनी आपले घर सोडून पलायन करत आहेत. लाखोंनी बांगलादेशात पळ काढला, तर हजारो अजुनही प्रवासात आहेत. म्यानमारहून बांगलादेशात एंट्री करण्यासाठी त्यांना जीवघेणी नदी पार करावी लागत आहे. छोट-छोट्या बोटींमध्ये खचा-खच भरून ते बांगलादेशच्या सागरी सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात कित्येक नाव उलटून शेकडो शरणार्थी ठार झाल्याचे वृत्त देखील येत आहेत. विस्थापितांच्या वाटेत केवळ नदीच नव्हे, तर कयेक किमीचा चिखल सुद्धा जीवघेणे ठरत आहे. 
 

असा सुरू झाला संघर्ष...
- रॅखीन प्रांतात 25 ऑगस्ट रोजी पुन्हा उसळलेल्या हिंसाचारात रोहिंग्या मुस्लिम युवकांनी कथितरीत्या एका पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्यानंतर पोलिस आणि लष्कराने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. 
- हिंसाचार तसेच लष्कर आणि पोलिसांच्या कारवाईमुळे आता तेथील रोहिंग्या मुस्लिमांना देश सोडून पळ काढावा लागत आहे. ते सगळेच बांगलादेशच्या दिशेने निघत आहेत.
- पलायन करण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाईच नव्हे, तर बौद्ध समुदायाकडून होणाऱ्या हल्ल्यांना सुद्धा एक मोठे कारण मानले जात आहे. ते राहत असलेल्या शेकडो गावांवर स्थानिक बौद्ध समुदायाचे हल्ले झाले आहेत. याच भितीने ते पलायन करण्यासाठी विवश आहेत. 
- रोहिंग्या मुस्लिम समुदाय म्यानमारचे मूळ निवासी नसल्याचे सांगत त्यांना बाहेर काढले जात आहे. भारतासह कुठल्याही इतर देशाने त्यांना शरण देण्यास स्पष्ट नकार दिला. म्यानमारच्या सुरक्षा रक्षकांवर सुद्धा त्यांच्या हिंसाचाराचे आरोप लावले जात आहे. मात्र, पोलिस आणि लष्कराने सांगितल्याप्रमाणे, रोहिंग्या समुदाय त्यांच्यावर हल्ले करत असल्याने सुरक्षा रक्षक प्रत्युत्तर देत आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...