Home »International »Other Country» Dawood Ibrahim Britain Property Siezed

दाऊदच्या चाळीस हजार कोटींच्या संपत्तीवर टाच; भारत सरकारचे मोठे यश

वृत्तसंस्था | Sep 14, 2017, 05:29 AM IST

  • ब्रिटनमध्ये त्याच्या हॉटेल आणि घरांची किंमत 4 हजार कोटींच्या घरात आहे.
लंडन-मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमच्या ब्रिटनमधील सुमारे ४० हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्तीला जप्त करण्यात आले आहे. ब्रिटनच्या वॉर्विकशायरमध्ये एक हॉटेल, मिडलँड्समध्ये निवासी संकुलांची मालकी दाऊदकडे होती.
ब्रिटनच्या अर्थ विभागाच्या यादीनुसार दाऊदने वेगवेगळ्या नावाने सुमारे २ हजार ८८२ (४५० दशलक्ष डॉलर) कोटी रुपयांची संपत्ती जमवली होती. ही संपत्ती ब्रिटनने जप्त केली आहे. भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ब्रिटनमध्ये दाऊदची संपत्तीची आेळख पटवणे आणि त्यास जप्त करण्यासाठी मदत करण्यासाठी २०१५ मध्ये मिडलँड्सचा दौरा केला होता. दाऊद पाच महाखंडांतील १६ देशांत डी कंपनी नावाने बेकायदा धंदा करतो. त्यात युरोप, आफ्रिका, दक्षिण आशियाचा समावेश आहे.

दाऊद पाकिस्तानमध्ये दडून बसल्याचा दावा केला जातो. १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड तसेच पाकिस्तानच्या आयएसआयकडून केल्या जाणाऱ्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमागेदेखील दाऊदचा हात असल्याचा आरोप आहे.

आम्ही सोडणार नाही -व्ही. के. सिंह
केवळ दाऊदविषयीच नव्हे, तर काही गोष्टी घडत असतात. कारवाई होत असते. म्हणूनच आम्ही गुन्हेगारांना असे सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली. तिरुवनंतपुरममध्ये बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
ब्रिटनच्या यादीत ‘भाईपासून सेठ, बडा’पर्यंतची नावे
भारताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्रिटनला दाऊदच्या खोट्या नावांची यादी तयार करून कडक पाऊल उचलण्यासाठी मदत झाली. नावे ऐकून कोणीही चक्रावून जाईल. वेगवेगळ्या नावांनी दाऊदने अनेक मालमत्तांची मालकी घेतली होती. अब्दुल, भाई, बडा, इक्बाल दिलीप, अजीज, फारूक, हसन, सेठ, बडा, साहब, कासकर, अनिस, साबरी अशी पन्नासहून अधिक नावे धारण करून बेकायदा धंदा केला जात होता.
भारत सरकारचे मोठे यश
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मोठे यश आल्याचे मानले जात आहे. ब्रिटनने दाऊद इब्राहिमची आपल्या देशातील संपत्ती जप्त केली आहे. यात वॉरविकशायर येथील हॉटेल आणि अनेक आलीशान घरांचा समावेश आहे. ब्रिटिश सरकारने दाऊदला आर्थिक निर्बंधांच्या यादीत समाविष्ट केले होते. तत्पूर्वी भारत सरकारने ब्रिटनला याबाबतचे डोझियर देखील सोपविले आहे.
जगातील दुसरा सर्वात धनाढ्य गॅँगस्टर
फोर्ब्स मॅगझीनच्या आकडेवारीनुसार, जगातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमकडे 6.7 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे. त्याला जगातील दुसरा सर्वात धनाढ्य गँगस्टर म्हटले जाते. 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊदची तेथील संपत्ती 4 हजार कोटींच्या घरात आहे.

Next Article

Recommended