आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात दाऊद इब्राहिम याची प्रकृती गंभीर; \'भाई फिट अँड फाइन\', छोटा शकीलचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अंडरवर्ल्ड डॉन व मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी कुख्यात दाऊद इब्राहिमची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सध्या वेंटिलेटरवर असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले.
 
दरम्यान, दाऊदचा हस्तक छोटा शकील याने या वृत्ताचा इन्कार केला असून दाऊदची प्रकृती उत्तम असल्याचे तो म्हणाला. गेल्या वर्षभरापासून पायातील गँगरिनमुळे आजारी आहे. यातच त्याला ब्रेन ट्यूमरही झाला होता. पाकमधील प्रसिद्ध डॉक्टरांनी २२ एप्रिल रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली होती. तेव्हापासून त्याची प्रकृती गंभीरच होती. याचदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रकृती अधिकच बिघडली. दरम्यान, दाऊदचे पाकमधील अस्तित्व उघड होऊ नये म्हणून त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होणार नाही, असे भारतीय गुप्तचर संस्थांना वाटते. 
बातम्या आणखी आहेत...