आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉटेलच्या छताला टांगली मेलेली गाय, जगभरातून संताप...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - एडिलेड येथे एका पिज्जा रेस्टॉरंटमध्ये मृत गाय छताला लटकवणे मालकाला महागात पडले आहे. सोशल मीडियावरून हा फोटो जगभरात व्हायरल झाला. यानंतर जगभरातील अॅनिमल राइट्स संस्थांनी रेस्टॉरंट मालकाविरुद्ध मोर्चा उघडला. या रेस्टॉरंटच्या मालकाची जगभरात कुप्रसिद्धी केली जात आहे. मात्र, मालकाने यासंदर्भात वेगळीच प्रतिक्रिया दिली. 
 

सांगितले हे कारण...
- एडिलेडचे हे रेस्टॉरंट अगदी कत्तलखान्याच्या डिझाइनवर तयार करण्यात आले आहे. त्याच्या छताला एक 8 वर्षांची एक मृत गाय टांगण्यात आली आहे.  
- एटिका रेस्टॉरंटने जगभरात आपली कुप्रसिद्धी सुरू असल्याचे पाहता फेसबूकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यानुसार, गायीला उलटे लटकवण्याचा हेतू रेस्टॉरंटला डेकोरेट करण्याचा मुळीच नव्हता. डेअरी अर्थात दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायावर किती वाइट वेळी आली हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 
- फेसबूक पोस्टमध्ये हेही लिहिले, की लोकांना विचार करावा लागेल की ते जे काही खात आहेत, मग ते डेअरी प्रॉडक्ट असो वा मांस नेमके कुठून येत आहे.
 

सोशल मीडिया झाला भावनिक...
- सोशल मीडियावर अॅनिमल अॅक्टिविस्ट्सने रेस्टॉरंटचे कृत्य अतिशय बीभत्स म्हणत विरोध सुरू केला. 
- एका यूजरने फेसबूकवर लिहिले, की विचार करा या गायीच्या जागी तुमच्या घरातील एखादी पाळीव मांजर किंवा कुत्रा असता तर...
- दुसऱ्या एकाने लिहिल्याप्रमाणे, आपण कित्येक शतक जुन्या अशा डार्क एजमध्ये जात आहोत. जेथे जनावरे आणि माणसांच्या मृतदेरांना असे लटकवून सोडून दिले जात होते. 
- चेंज नावाच्या एका वेबसाइटने रेस्टॉरंट विरोधात याचिका आणि सह्यांची मोहिम सुरू केली. तर काहींनी रेस्टॉरंट मालकाच्या विचार करण्याच्या पद्धतीचे समर्थन देखील केले आहे.
बातम्या आणखी आहेत...