आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ वर्षांनी हजमध्ये मोठी दुर्घटना, चार भारतीयांसह ७१७ मृत्युमुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीना (सौदी अरेबिया)- सौदी अरेबियातील पवित्र मक्का शहरातील मीनानजीक चेंगराचेंगरी होऊन गुरुवारी चार भारतीयांसह ७१७ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ८०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये झारखंडच्या दोघांसह हैदराबादच्या बीबीजान आणि केरळच्या थ्रिसूरचे मोहंमद यांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भिती बचाव पथकाने वर्तवली आहे. भारतीय मिशननुसार आसामचे दोघे जखमी आहेत.

मक्केच्या पूर्वेला मीनामध्ये ही दुर्घटना घडली. मीना येथे यात्रेकरू सैतानाला दगड मारण्याची प्रथा पूर्ण करतात. तेव्हा २० लाखांची गर्दी होती. दुर्घटनेनंतर यात्रेकरूंना पर्यायी मार्गाने सुरक्षितस्थळी नेण्यात आले. २२० अॅम्ब्युलन्स व ४ हजार लोक मदतकार्य करत आहेत. यात्रा सुरू होण्यापूर्वीच ११ रोजी मक्केच्या ग्रँड मशिदीत वादळी पावसामुळे क्रेन कोसळून ११ भारतीयांसह ११५ जणांचा मृत्यू झाला होता. हजयात्रेच्या काळात अशा दुर्घटना यापूर्वी झाल्या आहेत. पण १९९० मध्ये १४४२ लोकांचा मृत्यू झाला होता.
यात्रेकरूंशी संपर्क नाही; औरंगाबादेत नमाज, दुआ
हज यात्रेतील औरंगाबादच्या यात्रेकरूंशी संपर्क साधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण फोन लागत नाहीत. यामुळे कुटुंबीयांत चिंतेचे वातावरण आहे. मर्कज-ए-हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष करीम पटेल यांच्याशी संपर्क साधून अनेकांनी नातलगांची चौकशी केली. मराठवाड्यातून २ हजार ३८३ यात्रेकरू गेले आहेत. दरम्यान, नातलग सुखरूप परत यावेत यासाठी विशेष नमाज व दुआ केली जात आहे. काही यात्रेकरूंशी संपर्क झाला असून, मक्केतील भाविकांची माहिती घेत आहोत, असे पटेल यांनी सांगितले आहे. दरम्यान, मक्केतील ११ रोजीच्या क्रेन दुर्घटनेत पैठण तालुक्यातील शेख जफर (६६) यांच्यासह मराठवाड्यातील तिघांचा मृत्यू झाला होता.
शेख जाफर शेख ( ६४, बालानगर, ता. पैठण), शेख अलाउद्दीन शेख उमराव (६३, शिऊर कासार, जि. बीड) शेख हैदर शेख शरफोद्दीन (६३, उदगीर, जि. लातूर) यांचा आधी मृत्यू झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र दुतावासाने जाहीर केली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अशी झाली चेंगराचेंगरी...